यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
काँग्रेस पक्षाचे नेते व खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्राच्या निमित्ता काढण्यात आलेल्या जनजागृती चित्ररथाचे तालुक्यात ठीकठीकाणी उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात येत आहे.कॉंग्रेस पक्षाचे नेते व युवकांचे प्रेरणास्थान व खासदार राहुल गांधी हे सद्या देशाची एकता व अखन्डता कायम राहावी हा दृष्टीकोणतुन त्यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते काश्मिर पर्यंत भारत जोडो पदयात्रा काढण्यात आली आहे.सदरील यात्रा नांदेड मार्गाने महाराष्ट्र दाखल झाली असुन दि.१८ रोजी बुलढाणा व अकोला या जिल्ह्यामध्ये पहोचणार आहे.खासदार राहुल गांधी यांनी काढलेली भारत जोडो पदयात्रेचे उद्देश्य व हेतु तसेच देशातील राजकारणारत गांधी घराण्याचे बलीदान व योगदान या संदर्भातील माहीती व जनजागृती करणारे चित्ररथ यावल तालुक्यातील सातोद,कोळवद,डोंगर कठोरा,हंबर्डी,कळमोदा,बोरखेडा,चितोडा, सांगवी व यावल शहरासह विविध ठीकाणी फिरत आहे.या चित्ररथाच्या माध्यमातुन आमदार शिरीष चौधरी हे नागरीकांना व युवकांना भारत जोडो पदयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन करीत आहे.तालुक्यात या चित्ररथाला नागरीकांचा व युवकांचा मोठा प्रतिसाद मिळत असुन विशेष म्हणजे ग्रामीण भागातील नागरीकांकडुन मिळणार प्रतिसाद हा लक्ष वेधणारा ठरत आहे.
यावेळी तालुक्यात भारत जोडो पदयात्रेसाठी जनजागृतीसाठी फ़िरत असलेल्या या चित्ररथयात्रेत आमदार शिरीष चौधरी,कॉंग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रभाकर सोनवणे,जि पी पाटील सर,माजी गटनेते शेखर पाटील,यावल शहरातुन राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रा.मुकेश येवले,शहराध्यक्ष अब्दुल करीम मनियार,माजी नगरसेवक गुलाम रसुल,मारूळ सरपंच असद जावेद अली,काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान,उपाध्यक्ष अनिल जंजाळे,राहुल गजरे,नईम शेख,धिरज कूरकुरे याशिवाय विविध गावचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह ग्रामस्थ मोठया संख्येत या चित्ररथासोबत सहभाग लाभत आहे.