Just another WordPress site

पहिल्या गोलमेज परीषदेचे उदघाटन प्रसंगी लंडनमध्ये डॉ आंबेडकर व सयाजीराव यांची भेट

-: संकलन :-

श्री.गंगाधर भिवसन वाघ (मुंबई)

थोर साहित्यिक,कवी,लेखक बौद्ध-डॉ.आंबेडकर तत्वज्ञान 

पहिल्या गोलमेज परीषदेचे उदघाटन प्रसंगी लंडनमध्ये डॉ आंबेडकर व सयाजीराव यांची भेट वृत्तांत  पुढीलप्रमाणे :-
१२ नोव्हेंबर १९३० रोजी गोलमेज परिषद (पहिली) सुरु झाली.ब्रिटिशानी या परिषदे बद्दल दाखविलेल्या कुतुहलाचे व उत्सुकतेचे परिणाम असे झाले की, परिषदेकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर ब्रिटिश नागरिकांची अलोट गर्दी उसळली होती. रस्त्याच्या दोन्ही कडेनी ब्रिटिशानी तुफान गर्दी केली. परिषदेचे उदघाटन करताना इंग्लडचे महाराजे पंचम जॉर्ज म्हणाले, “ही परिषद अपूर्व अशी असून त्यातील प्रतिनिधींची नावे भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षरानी नोंदली जातील”. रॅम्से मॅकडोनाल्ड यांची परिषदेच्या अध्यक्ष पदावर एकमताने निवड होते.

गोलमेज परिषद म्हणजे म्हणजे भारतीय घटना तयार करण्यासाठी नेमलेली घटना समिती नव्हती. भारतीय पुढाऱ्यांचे, संस्थानिकांचे मत जाणून घेणे व त्यावर ब्रिटिशांच्या प्रतिनिधी मंडळाने योग्य निर्णय देण्यासाठी विविध प्रश्नांवर साधक बाधक चर्चा करावयास बोलाविण्यात आलेली परिषद होती. परिषदेत सप्रु, जयकर, मुंजे, जिना, बिकानेरचे महाराज अशा अनेक भारतीय मुत्सद्यांचे तडाखेबंद अन कळकळीचे भाषण केले. एका मागून एक भारतीय पुढारी व संस्थानिक उभे राहुन आपले मत मांडत होते.

तेवढ्यात एक तरुण उठून उभा राहतो. सुदृढ बांधा, दणकट अंगकाठीचा, सर्वोत्तम पेहराव अन चेहऱ्यावर झडकणार तेज ज्यात सारी सभा न्हाऊन निघाली असा त्या शतकाचा महान विद्वान आता भाषणासाठी उभा झाला होता. अख्ख्या सभागृहात अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाज शास्त्र अशा अनेक विषयात ज्याच्या तोडीचा कोणीच नव्हता. अशा या महामानवाचं नाव होतं डॉ. भीमराव उर्फ बाबासाहेब आंबेडकर ! त्यांची बुद्धी वैभवाने झळाळलेली मुद्रा बघुन सभेतील सर्व सदस्यांचे डोळे दिपून गेले. नजरेतील आत्मविश्वास असा काही गरजत होता की, त्याचा प्रतिध्वनी प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके वाढवत होता. अखंड विद्यार्जन व अविश्रांत परिश्रमाने बुद्धिची कांती इतकी सतेज झाली होती की नजरेच्या टप्प्यात आलेले दगड धोंडे सुद्धा लख्ख लख्ख प्रकाशून निघाले. ज्यांचा जन्म अस्पृश्य समाजात झाला होता. परंतु केवळ बुद्धीच्या बळावर आज त्यांनी ब्रिटिशांच्या गावी, राजे- महाराजे व ब्राह्मण – मुस्लीम नेते यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याची गुणवत्ता खेचून आणली. असे परमपूज्य बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणास सुरुवात करतात—-
“ज्या लोकांची स्थिती गुलामांपेक्षा वाईट आहे, आणि ज्यांची लोकंसंख्या फ्रान्स या देशातील लोकसंख्येएवढी आहे, भारतातील या एकपंचमांश लोकांची गाऱ्हाणी मी परिषदेपुढे मांडत आहे.” मग डॉ बाबासाहेब आंबेडकर गर्जून सांगतात, “भारतातील सरकार हे लोकानी लोकांसाठी चालविलेले सरकार असावे.” सर्व सभा अवाक होते, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना दूषणे देणारे आश्चर्याने बघू लागतात. सगळे सभागृह स्तब्ध होऊन आश्चर्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर नजर रोखते ! हा देशभक्तीचा असा नमुना होता ज्याच्या पुढे स्वत:ला देशभक्त म्हणून मिरविणाऱ्यांनी एक मताने डॉ बाबासाहेबांच्या हाती सत्ता सुपुर्द करुन मुत्सद्दीपणा करायला हवा होता.

ते पुढे म्हणाले, “ब्रिटिश राज्य येण्याआधी माझ्या समाजाची जी परिस्थीती होती त्यात काडीमात्र बदल झालेला नाही. आज तुमच्या राज्याला सव्वाशे वर्ष उलटुन गेली तरी आमची गुलामी तशीच आहे. पूर्वी आम्हाला विहिरीवर पाणी भरायला मनाई होती, आजही आहे. पूर्वी आम्हाला मंदिर प्रवेश बंदी होती, आजही आहे. पूर्वी आम्हाला पोलिस दलात प्रवेश नव्हता, आजही नाही. पूर्वी आम्हाला सेनेत घेत नव्हते, आजही नाही. अशा अनेक मुलभूत प्रश्नाची उत्तरे मी आजही नकारात्मक देतो. याचा अर्थ असा आहे की ब्रिटिशांनी समतेचा जो तोरा मिरविण्याची सोंगे दाखविली आहेत ती साफ खोटी व फसवी आहेत. म्हणून आज अस्पृश्यांना वाटू लागले आहे की स्वराज्य मिळायला हवे. ब्रिटिशांपेक्षा, लोकानी लोकांसाठी चालविलेले राज्य यायला हवे. ही मागणी मुळात आकार घेण्याचे कारणच आहे ब्रिटिशांचे पक्षपाती राजकिय धोरण अन समतेचे सोंग ! असे हे निष्क्रिय सरकार काय कामाचे, ज्यांना सव्वाशे वर्षात इतका मूलभूत प्रश्न हाती घ्यावा असे वाटले नाही त्यांना राज्य करण्याचा खरचं नैतिक अधिकार आहे का ? याचं त्यांनी आत्मचिंतन करुन बघावं. भारतातील भांडवलदार किमान-वेतन कामगारांना देत नाही. जमिनी शेतकऱ्यांना मिळत नाही, जमिनदारांचे शेतकऱ्यांच्या जमिनीवर हक्क प्रस्थापित होत आहेत. या आर्थिक पिळवणुकीतून मुक्त करण्यासाठी कायद्यात बदल करुन लोकांना दिलासा देण्याचा अधिकार सरकारला असून सुद्धा तो वापरला जात नाही. अन हे सगळं का होत नाही तर हस्तक्षेपानंतर होणाऱ्या प्रतिकाराला घाबरुन ! असे भ्याड सरकार काय कामाचे ?” सगळ्या गोऱ्या साहेबांच्या माना आता खाली गेल्या होत्या. नजर जमिनीवर रोखून डॉ बाबासाहेबांकडून होणारा उद्धार ते झेलत होते. डॉ आंबेडकर यांची ओजस्वी वाणी चालू होती, “सध्या देशात तप्त वातावरण असल्यामुळे बळाचा वापर योग्य ठरणार नाही. स्वार्थी राज्यघटना मान्य होणार नाही. तुम्ही ठरवावे अन हिंदी लोकानी ऐकावे, असा हा काळ नाही. आता काळानुरुप लोकांमधे बरीच जागरुकता झाली किंवा क्षणोक्षणी ती घडवून आणली जात आहे. याचा एकंदरीत परिणाम तुम्हाला माघार घेणारा असेल, त्यापेक्षा मोठ्या मनाने जनकल्याणाचे निर्णय घेऊन समता रुजविण्याचे काम करावे.”

देशभक्तीचा असा उच्च कोटीचा नमुना पाहुन सगळे चकित झाले. ‘इंडियन डेली मेल’ ने असे प्रसिद्ध केले कि, डॉ बाबासाहेबांचे हे भाषण म्हणजे वक्तृत्वाचा एक उत्कृष्ट नमुना होय. (Ref: Indian Round Table Conference, p 123-29) हे पाहून
या सभेतील एक व्यक्ती कृतकृत्य झाली होती. चेहऱ्यावर प्रसन्नता दाटुन आली. डोळे भरुन आले, आपल्या हातून एक महान विद्वान घडविला गेल्याचा पुरावा मिळाल्यामुळे आपला जन्म सार्थकी लागला असे त्यांना वाटले अन डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. समाधान व कौतुकानी यांचे हृदय ओसंडून वाहू लागले. ते होते बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड ! डॉ बाबासाहेबांना विदेशी पाठविण्यास मदत करणारे हेच ते राजे. आज के डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘भीमपराक्रम’ पाहुन ते धन्य झाले होते. डॉ बाबासाहेबांना शुभेच्छा देऊन जेव्हा ते तिथल्या राजवैभवी निवासस्थानी जातात, तेंव्हा राणीला ही शुभवार्ता सांगून महाराज म्हणतात, “आपले सारे प्रयत्न आणि पैसा सार्थकी लागला आहे. कार्य सिद्धिस गेले, या डोळ्यांनी एका विद्वानाची वैभवशाली वाटचाल बघितली. ही माझ्या अयुष्यातील एक अपूर्व घटना होती.” याच खुषीत महाराज डॉ बाबासाहेब व मित्रपरिवाराला एक मोठी मेजवानी देतात !

Leave A Reply

Your email address will not be published.