जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
हतनुर धरण ते चोपडा या कामाच्या गुणवत्तेबाबतची चौकशी करण्यात यावी अशी मागणी जळगांव जिल्हा संघटक मनसे चेतन अढळकर यांनी अधीक्षक अभियंता लाभक्षेत्र प्राधिकरण जळगाव यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.या मागणीचे निवेदन नुकतेच देण्यात आले आहे.सदरहू या गैरव्यवहाराची पारदर्शक चौकशी करण्यात यावी अन्यथा आंदोलन छेडले जाईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
अधीक्षक अभियंता लाभक्षेत्र प्राधिकरण जळगाव यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,यावल तालुक्यातील पाटबंधारे या विभागाकडून पाटाच्या उजव्या साईटची बाजूची झाडे झुडपे व काटेरी झाडे काढण्याचे काम चालू होते ते काम चालु असतांना त्या ठिकाणी नित्कृष्ठ प्रतिचे काम निदर्शनास आले आम्ही संपुर्ण पाहणी केली असता ठिकठिकाणी रस्ता दुरूस्ती हि नित्कृष्ठ स्वरूपाची करण्यात आली आहे.संबंधित ठेकेदाराने हे काम केवळ बिले काढण्यासाठी घाई गडबडीत केल्याचे दिसून येत आहे.तरी झालेल्या या कामाचे संबंधित ठेकेदाराचे बिल काढण्यात येऊ नये कारण कोणतीही निविदा प्रक्रिया न करता ठेकेदार नेमणे हे बेकायदेशीर असून विशेष जवळच्या ठेकेदारास नेमणूक करून बिले काढण्याचा प्रकार हा पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाकडून करण्यात आलेला आहे. तरी या कामात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झालेला असून या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्यात यावी व भ्रष्ट अधिकारी कर्मचारी यांना कर्तव्यात कसूर केल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी व या प्रकरणाची पारदर्शक चौकशी करण्यात यावी अन्यथा मनसेतर्फे जन आंदोलन किंवा आमरण उपोषण केले जाईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.सदरील निवेदनावर जळगांव जिल्हा संघटक चेतन अढळकर,उपजिल्हा संघटक अजय तायडे,यावल तालुकाध्यक्ष किशोर नन्नवरे,यावल उपतालुकाध्यक्ष संतोष जवरे यांच्या स्वाक्षरी आहे.