डोंगर कठोरा येथील जि.प.शाळेत निपुण भारत अभियान अंतर्गत माता पालक मेळावा उत्साहात
माता पालकांचा हिरीरीने सहभाग
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी)-तालुक्यातील डोंगर कठोरा येथील जिल्हा परिषद मराठी मुला मुलींच्या शाळेत निपुण भारत अभियान अंतर्गत माता पालक मेळावा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपशिक्षक शेखर तडवी यांची मुलगी परी हिच्या वाढदिवसानिमित्ताने सर्व मुलांना मध्यान्न भोजन प्रसंगी सोनपापडी वाटप कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळु आढाळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन सरपंच नवाज तडवी व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व ग्रा.पं.सदस्य दिलीप तायडे हे होते.प्रसंगी विद्यार्थ्यांचे अध्ययन व अध्यापन ,मुलांच्या अध्ययनावर लक्ष केंद्रीत करणे,बालकांचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी माता पालकांची जबाबदारी,संकल्पनात्मक विकास व जीवन कौशल्य अशा बालकांच्या विभिन्न विकास क्षेत्रांबाबत तसेच निपुण भारत अभियानाची रूपरेषा व महत्त्व याबाबत मुख्याध्यापक दिवाकर सरोदे यांनी माहिती दिली.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळु आढाळे,सरपंच नवाज तडवी व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व ग्रा.पं.सदस्य दिलीप तायडे,उपशिक्षक शेखर तडवी यांनी विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थितीचे महत्त्व,विद्यार्थ्यांना योग्यवेळी मार्गदर्शन व सुचना देण्याची गरज,विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणे,माता पालकांनी विद्यार्थ्यांची शाळेतुन घरी आल्यावर व सुटीच्या काळात घ्यावयाची काळजी व जबाबदारी तसेच विद्यार्थ्यांबाबत सकारात्मक द्रुष्टीकोन माता पालकांनी ठेवणे अशा विविध विषयांतून मनोगतातून विचार मांडले.यावेळी माता पालक यांच्या अडीअडचणी व प्रश्न समजुन घेण्यात आल्या व त्यावरील उपाययोजना याबाबत चर्चा करण्यात आली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार मुख्याध्यापक दिवाकर सरोदे यांनी मानले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळु आढाळे,सरपंच नवाज तडवी व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व ग्रा.पं.सदस्य दिलीप तायडे,मुख्याध्यापक दिवाकर सरोदे,उपशिक्षक शेखर तडवी,उपशिक्षका सुलोचना सरोदे,विजया पाटील,माता पालक संघातील मंगला बऱ्हाटे,अश्विनी तायडे,शोभाबाई बाविस्कर,जनाबाई सरोदे,सुनंदा सोनवणे,शरीफा तडवी,सुनंदा झोपे,गायत्री फेगडे,वर्षा पाटील,पुजा कोल्हे,ज्योती सोनवणे,हालिमा तडवी,योगीता पाटील,रमेश आढाळे,कुर्बान तडवी,वासुदेव बऱ्हाटे,लुकमान तडवी,अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासह माता पालक बहुसंख्येने उपस्थित होते.