“संजय राऊत व जितेंद्र आव्हाडांवरील गुन्हे मागे घेतल्यास शिंदे गटात बिनशर्त प्रवेश करू”
ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका किरण दराडे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
नाशिक-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका किरण दराडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्राची सध्या नाशिकमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल केलेले गुन्हे मागे घेतल्यास शिंदे गटात बिनशर्त प्रवेश करू असे आशयाचे पत्र माजी नगरसेविका किरण दराडे यांनी लिहिल्याने नाशिकच्या राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगू लागल्या आहेत.
विरोधकांवरच गुन्हे दाखल होत असून त्यांच्यावरच सरकार सूडबुद्धीने कारवाई करत आहे.विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप होत असतानाच आता नाशिकमधील ठाकरे गटाच्या एका माजी नगरसेविकेने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले आहे.संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाडांवरील गुन्हे मागे घेतल्यास बिनशर्त शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे पत्रात म्हटले आहे त्यांच्या या उपरोधिक पत्राची आता चांगलीच चर्चा रंगली असून ते व्हायरल देखील होत आहे.
शिंदे-फडणवीस सरकार विरोधकांवर दबाव आणण्यासाठी विरोधकांवर सूडबुद्धीने खोटे गुन्हे दाखल करत असून विरोधकांचा आवाज दाबण्याच काम हे सरकार करत आहे अश्या प्रकारचा सूर विरोधकांमध्ये निघत आहे.त्यात आता नाशिकच्या ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका किरण गामणे (दराडे) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे.संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाडांवरील गुन्हे मागे घेतल्यास बिनशर्त शिंदे गटात प्रवेश करणार असून अन्य तीन सहकारी माजी नगरसेवक देखील धूमधडाक्यात शिंदे गटात प्रवेश करतील असा पत्रात उल्लेख करण्यात आला आहे.मुख्यमंत्री महोदय गेल्या चार दिवसात जितेंद्र आव्हाड साहेब यांच्यावर व्यक्तिगत दोष मनात धरून दोन खोटे गुन्हे दाखल केले,तुरुंगात डांबले त्याचप्रमाणे खासदार संजय राऊत साहेब यांना बेकायदेशीर अटक केली.सर्व प्रकार निषेधार्थ आहे.”माननीय जितेंद्र आव्हाड व खासदार संजय राऊत यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घेतल्यास आपला सन्मान करीत मी नगरसेविका किरण दराडे व माझ्यासोबतच्या सहकारी नगरसेविका आम्ही बिनशर्त शिंदे गटात तात्काळ धुमधडाक्यात प्रवेश करू असे पत्रात नमूद करण्यात आलेले आहे.या पत्रावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात हे मोठे रंजक ठरणार आहे.