Just another WordPress site

शिवसेनेनंतर भाजपाचा आणखी एक मित्र पक्ष दुरावणार

आगामी निवडणूका स्वबळावर लढणार ?

बारामती -पोलीस नायक (वृत्तसेवा):-बारामती शहरात राष्ट्रीय समाज पक्षाचा १९ वा वर्धापन नुकताच उत्साहात पार पडला.यावेळी येणाऱ्या पुढील काळात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थासह आगामी विधानसभेच्या २८८ जागा या ‘रासप’कार्यकर्त्यांनी स्वबळावर लढण्याचा आग्रह धरला असल्यामुळे भाजपा वर असलेली रासपची नाराजी यानिमित्ताने पुढे आली आहे.त्यामुळे शिवसेनेप्रमाणे भाजपाचा मित्रपक्ष असलेला रासप साथ सोडणार का ?याबाबत प्रश्न उपस्थित केली जात आहेत.

गेल्या २०१४ सालापासून भाजपा शिवसेना महायुतीसोबत रासप पक्ष सहभागी झाला होता.मात्र सध्या भाजपा सोबत मित्रत्वाचे संबंध राहिलेले नसल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केली जात आहे.त्याचबरोबर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काही घडामोडीमुळे रासप कार्यकर्ते नाराज असल्याचे सांगितले जात आहे.त्यामुळे रासप कार्यकर्त्यांमध्ये ‘एकला चलो रे ‘ची भूमिका ठाम असल्याचे दिसून येत आहे.वर्धापनदिन कार्यक्रम प्रसंगी कार्यकर्त्यांनी आपली भूमिका बोलून दाखविली आहे.यात रासप प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष संदीप चोपडे यांची रासपच्या जिल्हाध्यक्ष पदी फेरनिवड करण्यात आली.या कार्यक्रमाला राष्ट्रीय समाज प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते,मुख्य महासचिव माऊली सलगर यांनी मार्गदर्शन केले.

या वेळी रासप तालुकाध्यक्ष अमोल सातकर,रवींद्र कोठारी,बाळासाहेब कोकरे,संजय माने,वैशालीताई विरकर,सुनील बंडगर,किरण गोफणे,तानाजी मारकड,ज्योतीराम गावडे,विठ्ठल देवकाते,गिरधर ठोंबरे,श्याम घाडगे,शैलेश थोरात,लखन कोळेकर,अविनाश मासाळ,काका बुरुंगले,दादा भिसे,महादेव कोकरे यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात राहिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमार देवकाते यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.