धुळे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रात एका पोलीस निरीक्षकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. प्रविण कदम असे या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे.आत्महत्या करण्यापूर्वी प्रवीण कदम यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली असल्याचे देखील उघड झाले आहे या घटनेमुळे धुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.प्रशिक्षण केंद्रातील शासकीय निवासात हा गळफास घेतला असून आत्महत्येचे नेमके कारण मात्र समजू शकलेले नाही.पोलीस निरीक्षक प्रवीण कदम हे गेल्या तीन वर्षांपासून धुळे येथे नियुक्त होते.या घटनेमुळे पोलीस दलात हळहळ होत आहे.आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या बेडरूममध्ये एक सुसाईड नोट आढळून आली आहे.त्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये एका अपघाताच्या गुन्ह्याचा योग्य प्रकारे तपास झाला नसल्याने खंत व्यक्त केली आहे.घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक संजय बारकुंड यांच्यासह पोलीस अधिकारी यांनी पोलीस निरीक्षक प्रवीण कदम यांनी आत्महत्या केलेल्या ठिकाणाची पाहणी केली.पोलीस निरीक्षक प्रविण कदम यांचे हिरे शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
कदम यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे की,’याला मी जबाबदार आहे यास कोणीही जबाबदार नाही.गंगापूर पोलीस ठाणे येथील फेटल गुन्ह्याचा चुकीचा तपास करणीभूत असल्याचे म्हटले आहे.प्रवीण कदम यांनी लिहिलेल्या या धक्कादायक सुसाईड नोटमुळे एकच खळबळ उडाली आहे त्यामुळे गंगापूर पोलीस ठाण्यात कुठला गुन्हा हा चुकीच्या पद्धतीने हाताळण्यात आला तसेच यामागे त्यांच्यावर कोणाचा दवा होता का? यासर्व गोष्टींचा उलगडा झाल्यावरच समजेल की प्रवीण कदम यांनी आत्महत्या का केली?.धुळे पोलिसांनी प्रवीण कदम यांनी आत्महत्या का केली व या सुसाईड नोटचा त्यांच्याशी काय संबंध आहे या सर्व गोष्टींचा तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे.