Just another WordPress site

“चित्राताई आपल्या नवऱ्याचे किंवा आपल्या नेत्यांचे अर्धनग्न छायाचित्र जर प्रसारीत झाले असते तर आपण काय केले असते?”

जितेंद्र आव्हाड यांचा चित्रा वाघ यांना थेट सवाल

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर एका महिलेने विनयभंगाचा आरोप केल्यांनतर भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आव्हाडांवर टीका केली होती तसेच त्यांचे जूने प्रकरण बाहेर काढत ज्यांनी घरी बोलावून एकाला बेदम मारहाण केली त्यांना कायदा-सुव्यवस्थेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही असे म्हटले होते.त्यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर देत चित्रा वाघ यांचा समाचार घेतला आहे.चित्राताई आपल्या नवऱ्याचे किंवा आपल्या नेत्यांचे अर्धनग्न छायाचित्र जर प्रसारीत झाले असते तर आपण काय केले असते असा थेट सवाल आव्हाडांनी केला आहे.

ज्या माणसाने २०१६ ते २०२० माझा पाठलाग केला.ट्वीटर फेसबुक चा वापर करत बदनामी केली.ब्लॉक केल्यानंतरही दुसऱ्या मार्गाने तो मला त्रास देतच राहिला टीका करणाऱ्यांनो तुमच्या भावाचे तुमच्या वडिलांचे किंवा तुमच्या स्वतःचे अशाप्रकारे नग्न छायाचित्र काढल गेले असते तर किंवा इतके वर्षे त्रास इतके वर्षे त्रास दिला गेला असता तर आपण काय केले असते?असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.चित्राताई आपल्या नवऱ्याचे किंवा आपल्या नेत्यांचे अर्धनग्न छायाचित्र जर प्रसारीत झाले असते तर आपण काय केले असते याचे उत्तर कधीतरी द्या.२०१६ ते २०२० त्याने काय केले हे जरा कधीतरी बोलावून विचारा आणि मग टीका करा असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे.जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात एका महिलेने विनयभंगाचा आरोप केल्यांनतर आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा दिला यांनतर चित्रा वाघ यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला होता.“माझा संविधानावर विश्वास आहे असे जितेंद्र आव्हाड नेहमी म्हणतात मग त्यांना वाटत असेल गुन्हा केलेला नाही तर त्यांनी न्यायालयावर विश्वास ठेवावा.आमदारकीचा राजीनामा देऊ असे म्हणून पोलिसांवर जर दबाव आणण्याचा प्रयत्न असेल तर ते कधीही शक्य होणार नाही.ज्यांनी घरी बोलावून एकाला बेदम मारहाण केली त्यांना कायदा-सुव्यवस्थेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही अशी जोरदार टीका चित्रा वाघ यांनी केली होती.
Leave A Reply

Your email address will not be published.