श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे धुण्यासाठी आफताबला लागले दहा तास !!
पोलीस तपासात आफताफने केला धक्कादायक खुलासा
वसईतील २६ वर्षीय श्रध्दा वालकरच्या खूनाने देश हादरला आहे.प्रियकर आफताब अमीन पूनावाला याने श्रद्धाचा खून करुन तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवले होते त्यानंतर सलग १८ दिवस आफताब श्रद्धाचे तुकडे जंगलात फेकत होता.सहा महिन्यानंतर हे हत्याकांड समोर आल्याने खळबळ उडाली आहे त्यात आता श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करताना आफताबने जेवणाची ऑर्डर देऊन चित्रपट पाहिल्याचा धक्कादायक खुलासा पोलीस तपासात केला आहे.इंडिया टुडेनी दिलेल्या वृत्तानुसार,आफताबने श्रद्धाचा गळा दाबून खून केला त्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले हे तुकडे करून पाण्याने धुण्यासाठी त्याला १० तासांचा कालावधी लागला थकल्यानंतर आफताबने थोडी विश्रांती घेतली तेव्हा त्याने झोमॅटोवरून जेवण्याची ऑर्डर दिली नेटफ्लिक्सवर एक चित्रपट पाहिला त्यानंतर बिअर पित सिगरेट ओढल्याचे आफताबने पोलीस तपास सांगितले आहे.
दरम्यान श्रद्धाच्या शरिराचे तुकडे केल्यानंतर तिचा चेहरा जाळल्याची कबुली आफताबने पोलिसांना दिली आहे.श्रद्धाची ओळख लपवण्यासाठी आफताबने हे कृत्य केले आहे.खूनानंतर शरिराची विल्हेवाट कशी लावायची?याबाबत इंटरनेटवरून माहिती घेतल्याचेही आफताबने पोलिसांना सांगितले आहे.आफताबच्या नार्को टेस्टला आता दिल्ली न्यायालयाने परवानगी दिली आहे.त्यासोबतच आफताबच्या पोलीस कोठडीमध्ये पाच दिवसांची वाढ करण्यात आली आहे त्यामुळे श्रद्धाचा खून आफताबनेच केला असल्याचा कबुलीजबाब जरी पोलिसांकडे असला तरी या प्रकरणातील गूढ उकलण्यात या कबुलीजबाबामुळे मोठी मदत होण्याची शक्यता आहे.