मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना आवश्यकतेनुसार तात्काळ प्राथमिक वैद्यकीय मदत व उपचार मिळावे या हेतूने महापालिकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या ५१ बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला आरोग्यमंत्री तानाजी सावंत,मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर,मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा,स्थानिक खासदार राहुल शेवाळे,स्थानिक आमदार वर्षां गायकवाड,आमदार सुनिल शिंदे व राजहंस सिंह तसेच आयुक्त इकबाल सिंह चहल,अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ.संजीव कुमार आदी उपस्थिती होते.