डोंगर कठोरा जि.प.शाळेत विद्यार्थ्यांनी फोडली दहीहंडी
शाळेतील कार्यक्रमाने विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत
यावल-पोलीस नायक -(प्रतिनिधी)-तालुक्यातील डोंगर कठोरा येथील जिल्हा परिषद मराठी मुला मुलींच्या शाळेत श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पावन पर्वावर दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम दि.२० रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.तर कोरोना काळानंतर वाढीव उपक्रमाअंतर्गत दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम हा विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत करणारा ठरला.
यानिमित्ताने शाळेच्या प्रांगणात दहीहंडी टांगण्यात आली व विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या गाण्यांवर दांडीया खेळून आनंद लुटला.शाळेतील सर्वच मुलं मुलींनी राधा व श्रीकृष्ण यांचा पेहराव केलेला स्मरणीय राहिला.कृष्णा सोनवणे या विद्यार्थ्याने श्रीकृष्णाची वेशभूषा साकारली व याच विध्यार्थ्यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली.
सदरील कार्यक्रम केंद्र प्रमुख महम्मद तडवी व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळु आढाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुख्याध्यापक दिवाकर सरोदे,उपशिक्षक शेखर तडवी,उपशिक्षिका विजया पाटील,सुलोचना सरोदे यांच्या रुपरेषेखाली घेण्यात आला.प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य खुशाल कोळी,ग्रा.पं.सदस्य दिलीप तायडे,महंमद तडवी,धनश्री बाऊस्कर,सुरेश झांबरे पालक रमेश आढाळे,प्रदीप पाटील,शेरमहम्मद तडवी,ईस्माईल तडवी,उर्दु शाळेचे मुख्याध्यापक सैय्यद आदील हुसेन,उपशिक्षक ईस्माईल तडवी तसेच केंद्र शाळेअंतर्गत १५ शाळांचे मुख्याध्यापक आदींची उपस्थिती राहिली.कार्यक्रमास संमिश्र मित्र मंडळाचे अनमोल सहकार्य मिळाले.