ज्योतिषाकडे भविष्य पाहिल्यावरून राज्यात घमासान-राजकीय प्रतिक्रिया विशेष वृत्तांत देश घडामोडी विशेष By टीम पोलीस नायक On Nov 25, 2022 0 पोलीस नायक टीम (वृत्तसेवा):- ज्योतिषाकडे भविष्य पाहिल्यावरून राज्यात घमासान-राजकीय प्रतिक्रिया विशेष वृत्तांत पुढीलप्रमाणे :- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (२३ नोव्हेंबर) शिर्डी दौऱ्यावर असताना सिन्नरला जाऊन ज्योतिषाकडे भविष्य पाहिल्याचा आरोप झाला. यानंतर राज्यात घमासान होऊन राजकारणाचा पारा चांगलाच चढला. यावर शरद पवारांपासून अजित पवार,सुप्रिया सुळे,दीपक केसरकर,गुलाबराव पाटील,रविकांत वरपे आणि अंनिसपर्यंत अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. एकनाथ शिंदेंनी भविष्य पाहिल्याच्या आरोपानंतर नेमके कोण काय म्हणाले याचा हा आढावा. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःचे भविष्य बघण्यासाठी नाशिकला जातात पण ज्या महाराष्ट्राचे भवितव्य उद्योग धंद्यावर अवलंबून आहे ते उद्योग धंदे गुजरातला चालले आहेत –रविकांत वरपे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते) महाराष्ट्राचे भवितव्य येथील गावांवर,जिल्ह्यांवर आहे. त्या गावांवर,जिल्ह्यांवर कर्नाटकचे मुख्यमंत्री हक्क दाखवतात.महाराष्ट्राचे भवितव्य अंधकारमय करायला निघालेले मुख्यमंत्री स्वतःचे भवितव्य बघतात –रविकांत वरपे मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना नम्र आवाहन करतो की महाराष्ट्राच्या तरुणांचा रोजगार,महाराष्ट्रातील गावांचे,महाराष्ट्राचे दोन तुकडे करण्याऐवजी महाराष्ट्राच्या भविष्याकडे लक्ष द्या.नाहीतर महाराष्ट्राची जनता तुमचे भवितव्य अंधकारमय केल्याशिवाय राहणार नाही –रविकांत वरपे आपण का अंधश्रद्धेला खतपाणी घालतो मला समजत नाही.प्रत्येकाची कुठे ना कुठे निष्ठा असते विश्वास असतो त्याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही.मात्र मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्षात वस्तुस्थिती स्पष्ट केली पाहिजे–अजित पवार (विरोधी पक्षनेते) एक गोष्ट खरी आहे की आम्ही राजकीय लोक कुठेही गेलो तर तेथील स्थानिक देवस्थानांना भेट देतो – अजित पवार शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसचं अधिवेशन होते तेव्हा आम्ही सकाळी सकाळी लवकर जाऊन शिर्डी साईबाबांचे दर्शन घेतले.पंढरपूर परिसरात जातो तेव्हा आम्ही पांडुरंगाचे दर्शन घेतो.जेजुरी परिसरात जातो तेव्हा खंडेरायाचे दर्शन घेतो.तुळजापूर परिसरात तुळजाभवानीचे दर्शन घेतो.कोल्हापुरात गेल्यावर अंबाबाईचे दर्शन घेतो –अजित पवार ही आपली परंपरा आहे त्याबद्दल आपल्या मनात आदराचे ,श्रद्धेचे स्थान आहे तिथपर्यंत मी समजू शकतो –अजित पवार ज्योतिषाकडे जाऊन आपले भविष्य बघणे म्हणजे २१ व्या शतकात सर्व जग चालले असताना आपण अंधश्रद्धांना खतपाणी घालण्यासारखे आहे –अजित पवार तंत्रज्ञानाच्या युगात अनेक बदल होत आहेत अशावेळी विज्ञान काय सांगतंय हे न पाहता पुरोगामी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्योतिष बघतात यावर काय बोलावे आमच्यासारखे तर हतबलच झालेत – अजित पवार प्रत्येकाची श्रद्धा असते श्रद्धेवर आमचा सर्वांचा विश्वास आहे पण अंधश्रद्धेवर नाही – सुप्रिया सुळे (खासदार,राष्ट्रवादी काँग्रेस) डॉ. नरेंद्र दाभोलकर महाराष्ट्राची एक वेगळी ओळख आहे.अंधश्रद्धा निर्मुलनाच्या कामासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी त्यांचे आयुष्य पणाला लावले त्यामुळे महत्त्वाच्या पदावर असणाऱ्यांनी श्रद्धा ठेवली पाहिजे मात्र अंधश्रद्धेवर महाराष्ट्रात एक वेगळे मत आहे – सुप्रिया सुळे (खासदार,राष्ट्रवादी काँग्रेस) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकमध्ये असताना एका ठिकाणी जोतिषाकडे गेल्याची चर्चा आहे. यामध्ये तथ्य असेल तर हे अत्यंत वेदनादायी आहे – कृष्णा चांदगुडे (राज्य कार्यवाह,अंनिस) पुरोगामी महाराष्ट्रात संवैधानिक पदावर बसलेल्या एकनाथ शिंदेंचे हे वर्तन अत्यंत बेजबादारपणाचे आहे याचा अंधश्रद्धा निर्मूलन समिती तीव्र शब्दांत निषेध करते – कृष्णा चांदगुडे (राज्य कार्यवाह, अंनिस) ज्योतिष हे काही शास्त्र नाही ती स्वप्न विकण्याची कला आहे.जोतिष हे थोतांड आहे हे आम्ही वारंवार सिद्ध केलेले आहे – कृष्णा चांदगुडे (राज्य कार्यवाह,अंनिस) ज्योतिष थोतांड नसल्याचे सिद्ध करणाऱ्याला आम्ही २१ लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे यापूर्वी जाहीर केलेले आहे मात्र हे आव्हान स्वीकारण्यास कोणीही पुढे येत नाही – कृष्णा चांदगुडे (राज्य कार्यवाह, अंनिस) मुख्यमंत्र्यांनी ज्योतिषाकडे जाणे म्हणजे समाजात चुकीचा संदेश पसरविण्यासारखे आहे – कृष्णा चांदगुडे (राज्य कार्यवाह,अंनिस) आकाशातील गृह मानवी जीवनाव परिणाम करतात.कर्मकांड करून हा परिणाम बदलता येतो हा दावा चुकीचा आहे – डॉ. टी.आर.गोराणे (राज्य प्रधान सचिव,अंनिस) मुख्यमंत्रीपदावर असलेल्या व्यक्तीने वैज्ञानिक दृष्टीकोन नसलेल्या गोष्टीचा आधार घेतला असेल तर ती अंधश्रद्धाच आहे – डॉ. टी.आर.गोराणे (राज्य प्रधान सचिव,अंनिस) मुख्यमंत्री वारंवार बैठका घेत असून देवदर्शन करत आहेत यासंबंधी शरद पवार यांना विचारण्यात आले असता हात दाखवत त्यांनी आपण काही ज्योतिषी नसल्याचे म्हटले. मी काही ज्योतिषी नाही त्यामुळे मी काही सांगू शकणार नाही.माझा त्यावर विश्वासही नाही त्यामुळे मी दौरा सोडून हात दाखवायला कुठे जात नाही –शरद पवार (अध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस) आपण आता हल्ली नवीन गोष्टी पाहत आहोत.महाराष्ट्रात याआधी असे होत नव्हते –शरद पवार (अध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस) शिर्डीला जाणे आणि नंतर सिन्नरला जाऊन कोणाला तरी हात दाखवणे या गोष्टी आमच्यासाठी नवीन आहेत –शरद पवार (अध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस) पुरोगामी विचारांचे राज्य असा लौकिक असलेल्या महाराष्ट्रात या नवीन गोष्टी पाहायला मिळत आहेत पण जनता या गोष्टीचा स्वीकार करत नाही हे दाखवल्याशिवाय राहणार नाही –शरद पवार (अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस) कॅप्टन खरात म्हणून माझे एक मित्र आहेत त्यांचे ईशान्येश्वर हे मंदिर आहे तेथे गोशाळा व्हावी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एक देणगी दिली होती त्यामुळे कॅप्टन खरात यांची इच्छा होती की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एकदा ईशान्येश्वर मंदिराला आणि गोशाळेचे काम सुरू होणार आहे त्याला भेट द्यावी – दीपक केसरकर (मंत्री,शिंदे गट) आता कॅप्टन खरात यांचा व्यवसाय भविष्य पाहणे असेल तर भविष्य विचारायला मुख्यमंत्री ईशान्येश्वर मंदिरात का जातील? – दीपक केसरकर (मंत्री,शिंदे गट) भविष्य पाहायचे असते तर त्यांनी कॅप्टन खरात यांना मुंबईत बोलावून घेतले असते आणि भविष्य पाहिले असते त्यामुळे काहीही बातम्या देणे हे चुकीचे आहे – दीपक केसरकर (मंत्री,शिंदे गट) ते शिवभक्त असतील आणि त्यांनी आपल्या १० मित्रांना फोन करून देणगी द्या म्हणत खरोखर गोशाळेसाठी काही केले असेल तर ते गोशाळेसाठी आहे – दीपक केसरकर (मंत्री,शिंदे गट) एकनाथ शिंदे स्वत:चे भविष्य तयार करणारी व्यक्ती आहे त्यामुळे ते कोणाकडेही भविष्य पाहणार नाहीत अशी आम्हांला खात्री आहे उलट तेच भविष्यकाराचे भविष्य सांगतील –गुलाबराव पाटील (पाणी पुरवठा मंत्री) हात दाखवण्याचा विषयावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले,आत्मविश्वास होता म्हणून तर ५० आमदारांसोबत १३ खासदार माझ्याबरोबर आले. जे महाविकास आघाडीचे सरकार होते ते कुणाचे काम करत होते कुणासाठी सरकार चालवले जात होते ते सर्वसामान्यांना मान्य नव्हते म्हणून सर्वसामान्यांच्या मनातले सरकार आम्ही स्थापन केलेले आहे–एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री) हात आम्ही ३० जूनलाच ज्यांना दाखवायचा होता त्यांना दाखवलेला आहे,चांगला हात दाखवला आहे – एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री) सर्व फोटो –संग्रहित 0 Share