नाशिक-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
नाशिक जिल्ह्यात दरोड्याचे सत्र सुरुच असून शहरातील अंबड लिंक रोड परिसरात दरोडा पडल्याची घटना घडली आहे.या दरोड्यात ६५ वर्षीय वृद्धाचा खून करण्यात आला येऊन दरोडेखोर पसार झाले आहे.अनेक दिवसांपासून नाशिक शहरासह ग्रामीण भागात दरोड्याच्या घटनांमध्ये वाढ़ झाली आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान नाशिक शहरातील अंबड औद्योगिक वसाहतीतील एक्स्लो पॉईंट येथे दरोडेखोरांनी लूटमार करुन ६५ वर्षीय वृद्धाचा खून केल्याची घटना घडली आहे.
खून करण्यात आलेल्या वृद्धाचे कार्डिले कुटूंब अंबड लिंकरोड परिसरात वास्तव्यास आहे.काल शुक्रवारी सायंकाळी कर्डिले यांच्या घरातील इतर सदस्य बाहेर गेले होते.जगन्नाथ कर्डिले हे घरात एकटेच असताना अचानक दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला.कर्डिले यांना कुणीतरी आल्याची कुणकुण लागताच त्यांनी बाहेर येऊन पाहिले तर तोंड बांधलेले काही दरोडेखोर असल्याचे समजले.कर्डिले यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली मात्र दरोडेखोरांनी त्यांच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.