नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
सध्या अनेक नेते भावनेच्या भरात वादग्रस्त वक्तव्य करत आहेत.टीका करताना केल्या गेलेल्या वक्तव्यानंतर त्यांना पोलिसांच्या कारवाईसमोर जावे लागत आहे.अशीच वक्तव्य व शिवीगाळ काँग्रेसचे माजी आमदारआसिफ मोहम्मद खान यांनी पोलिसांना केले आहे.त्यांचा शिवीगाळ करतानाचा एका व्हिडिओ व्हायरल झाला असून एसआयसह दोन दिल्ली पोलिस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.याप्रकरणी शाहीनबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.