Just another WordPress site

यावल पोलीस स्टेशन मध्ये संविधान दिन साजरा

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- 

येथील पोलीस स्टेशनमध्ये आज दि.२६ नोव्हेंबर २२ रोजी ‘संविधान दिन’साजरा करण्यात आला.यानिमित्ताने यावल पोलीस स्टेशनला संविधानाचे पूजन करून संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले तसेच २६/११ च्या दहशतवादी हल्यातील शहिदांना दोन मिनिट स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली.

सदरील कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना व मॉर्डन इंग्लिश मिडीयम स्कूल यावल अध्यक्ष भूषण नगरे यांच्यातर्फे करण्यात आले.या कार्यक्रमाला उपस्थित पीएसआय प्रदीप बोरुडे, पीएसआय सुदाम काकडे,एएसआय विजय पाचपोळे,एएसआय मुजफ्फर शेख,एएसआय असलम खान,बालक बहारे,योगेश खडके,संदीप सूर्यवंशी,अशोक बाविस्कर,भूषण चव्हाण,जगन्नाथ पाटील,गणी मिर्झा,गणेश ढाकणे,अनिल पाटील,रहुफ शेख तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी कार्यक्रमाला उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.