मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी बुलढाणा दौऱ्यावर गेले होते यावेळी चिखली येथे पार पडलेल्या शेतकरी मेळाव्यातून उद्धव ठाकरेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली त्यांनी जाहीरसभेत मोबाइलवर एक ऑडिओ ऐकवून फडणवीसांवर निशाणा साधला.शेतकरी प्रश्नांवर फडणवीसांनी दिलेल्या आश्वासनाबाबत हा ऑडिओ होता.फडणवीसांनी जनाची नाही तरी किमान मनाची लाज बाळगावी असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला होता.या टीकेनंतर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडले आहे.दरम्यान भाजपा आमदार प्रसाद लाड यांनीही उद्धव ठाकरेंवर खोचक टीका आहे.माणूस सातत्याने घरात राहिला की त्याला विसरण्याची सवय लागते हा एक रोग आहे.उद्धव ठाकरेंना विसरण्याचा रोग झाला आहे अशी टीका प्रसाद लाड यांनी केली त्यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ जारी करत ही टीका केली आहे.