Just another WordPress site

गणपती विसर्जनानंतर पिंप्राळा रेल्वे गेट कायमस्वरूपी बंद होणार

रेल्वे प्रशासनाने जळगाव महानगरपालिकेला दिले पत्र

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी):-जळगाव शहरातील वाहतुकीचे मुख्य ठिकाण असलेले पिंप्राळा रेल्वे गेट हे गणपती विसर्जनानंतर कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे.सदरील रेल्वे गेट बंद करण्याबाबतचे पत्र नुकतेच रेल्वे प्रशासनाने महानगरपालिकेला दिले आहे.यात पिंप्राळा उड्डाण पुलाचे काम वेगाने सुरु आहे मात्र दुसऱ्या बाजूने अजूनही रेल्वे गेट बंद करण्यात आलेली नसल्याने वाहतूक सुरु आहे.अशामुळे कामाला अडथळा निर्माण होऊ शकतो.वाहतूक कोंडी होऊ नये त्याचबरोबर उड्डाण बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करता यावे या उद्देशाने रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेत गणपती विसर्जनानंतर सदरील रेल्वे गेट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

पिंप्राळा रेल्वे गेट जळगाव शहरात येण्याचा प्रमुख मार्ग असल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असते.त्याचबरोबर बघ्यांची गर्दीही वाढू लागली आहे.आता रेल्वे उड्डाण पुलाच्या पुढील कामाकरिता रेल्वे गेट बंद करण्याची गरज निर्माण झाली आहे त्यामुळे गणपती विसर्जनानंतर म्हणजेच ११ सप्टेंबर २२ नंतर हे रेल्वे गेट कायमस्वरूपी बंद करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.सदरील रेल्वे गेट बंद झाल्यावर मुख्य वाहतूक हि बजरंग बोगद्याकडून होणार आहे.आता येत्या काही काळात वाहतूक कोंडी होणार असली तरी वाहतूक बंद केल्याने पुलाचे काम लवकर पूर्ण होण्यास मदत होणार आहे.याबाबत रेल्वे गेट बंद करण्याबाबतचे पत्र नुकतेच रेल्वे प्रशासनाने महानगरपालिकेला दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.