कोल्हापूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अलीकडेच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते.राज्यपालांच्या या विधानानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका करण्यात आली होती.यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही राज्यपाल कोश्यारींना टोला लगावला आहे.राज्यपालांनी छत्रपतींबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत विचारले असता राज ठाकरे म्हणाले,त्या माणसाबद्दल काय बोलावे?मला हेच कळत नाही.मी त्यादिवशीच बोललो आहे की ते एका विशिष्ट पदावर आहेत म्हणून आपण त्यांना सोडून देतो नाहीतर महाराष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही.या राजकारणात अशी काही लोक आहेत ज्यांना पद येते पण पोहोच येत नाही त्यातली ही माणस आहेत त्यांना कधी कोणती गोष्ट बोलावी?कुठे बोलावी?आणि काय बोलावी याचे भान नाही.