रायगड-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
आरपीआय रायगडचे माजी जिल्हाध्यक्ष आणि पनवेल महानगर पालिकेचे माजी उपमहापौर जगदिश गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे.कर्जत येथील जबरी मारहाण आणि जीवे ठार धमकी दिल्याच्या प्रकरणात कर्जत पोलीसांनी ही कारवाई केली आहे.अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीसांवर गाडी घालण्याचा प्रयत्न यावेळी त्यांच्या चालकाकडून करण्यात आला आहे.जगदीश गायकवाड,तेजस चाफेकर आणि अन्य २० ते २५ जणांविरोधात २२ नोव्हेंबर रोजी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.तांबस तालुका कर्जत येथे राहणारे फिर्यादी हे कर्जत मुरबाड रोडवर मुद्रे येथील रिलायन्स पेट्रोलपंपासमोरून जात होते.यावेळी जगदीश गायकवाड आणि त्यांचे सहकारी त्या ठिकाणी आले त्यांनी फिर्यादी आणि त्यांच्या साक्षीदारांना हाताबुक्क्यांनी तसे लोखंडी फायटर ने मारहाण केली,जीवे ठार मारण्याची धमकी दिली.दुखापतही केली.मारहाणी दरम्यान फिर्यादी यांची चैन आणि अंगठी तुटली.
या प्रकरणी कर्जतच पोलीस काल सायंकाळी जगदीश गायकवाड यांना पनवेल येथे अटक करण्यासाठी गेले होते.पनवेल न्यायालयातून बाहेर पडत असतांना त्यांना पोलीसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला यावेळी त्यांच्या चालकाने पोलीसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला अखेर पोलीसांनी गाडी अडवून त्यांना ताब्यात घेतले आणि अटक केली.सहाय्यक पोलीस निरीक्षक उध्दव सुर्वे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.गायकवाड यांच्या विरोधात भा.द.वी कलम ३२४,३२३,३२७,१४३,१४७,१४९.५०४,५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.