‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक बोलणाऱ्यांना पदमुक्त करा’
तालुका मराठा क्रांती मोर्चाचे तहसीलदार महेश पवार यांना निवेदन
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे विषयी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या बेताल वक्तव्याबद्दल तसेच राज्याचे मंत्री मंगल प्रसाद लोंढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याबद्दल त्यांना पदमुक्त करण्याची कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन येथील तालुका मराठा क्रांती मोर्चाचे वतीने तहसीलदार महेश पवार यांना नुकतेच देण्यात आले.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे विषयी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अवमान जनक वक्तव्य केल्याच्या कारणावरून भगतसिंग कोश्यारी यांना तात्काळ पदमुक्त करावे तसेच राज्याचे मंत्री मंगल प्रसाद लोंढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेशी करून त्यांचा अवमान केला.छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारंवार होत असलेला अवमान हा महाराष्ट्र राज्याचा अवमान असल्याचे निवेदनात नमूद करत,राज्यपाल कोश्यारी यांना तात्काळ पदमुक्त करावे तसेच अवमान करणाऱ्या वर कारवाईची देखील मागणी निवेदनाव्दारे केली आहे.अन्यथा मराठा क्रांती मोर्चा कडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.निवेदनावर प्रा.मुकेश येवले,अतुल यादव,देवकांत पाटील,प्रशांत पाटील,नरेंद्र पाटील,दत्तात्रय पाटील,गणेश येवले,बापू जासूद, अशोक पाटील,योगेश चव्हाण,सुनील गावडे,भगवान पाटील,विलास देसले,राजेंद्र टोंगळे,दत्तात्रय पाटील,स्वप्निल चव्हाण,विजय सोनवणे,दौलत मराठे,निलेश पवार,प्रा.संजीव कदम,संतोष पाटील यांचेसह समाज बांधवांच्या सह्या आहेत.