Just another WordPress site

पश्चिम बंगालच्या एका राजकीय नेत्याच्या घरात बॉम्बस्फोट;तीन कार्यकर्त्यांचा मृत्यू

पश्चिम बंगाल-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
पश्चिम बंगालच्या पुरबा मेदिनीपूर भागात एका राजकीय नेत्याच्या घरात बॉंबस्फोट झाल्याची घटना घडली आहे.पुरबा मेदिनीपुर येथील भूपतीनगर ठाण्याच्या हद्दतील अर्जुन नगर भागात तृणमूल काँग्रेसचे बूथ अध्यक्ष राजकुमार मन्ना यांच्या घरी शुक्रवारी रात्री स्फोट झाला.या घटनेत टीएमसीच्या तीन कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे.या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,पश्चिम बंगालच्या पुरबा मेदिनीपूर भागात झालेल्या बॉम्बस्फोटात अन्य काहीजण जखमी झाले आहेत. रात्रीच्यावेळी झालेला बॉम्बस्फोट एवढा भीषण होता की त्यामध्ये बूथ अध्यक्षाचे संपूर्ण घर उध्वस्त झाले.ही घटना टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या कोंटाई येथे होणाऱ्या सभेपूर्वी घडली.बॉंबस्फोट झाल्याची माहिती मिळाताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतले व शवविच्छेदनासाठी पाठवले.जखमींना तत्काळ रुग्णलायत दाखल करण्यात आले आहे.याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.