यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी):- ताल्यक्यातील डोंगर कठोरा येथील जिल्हा परिषद मराठी मुला-मुलींच्या शाळेत दि.५ रोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्त डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन शिक्षिका बनलेली ४ थी ची विद्यार्थिनी चैताली धनगर हिने केले तर प्रतिमेचे पूजन शिक्षिका बनलेल्या तिसरीच्या विद्यार्थिनी आम्रपाली आढाळे व पायल राणे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रसंगी केंद्र प्रमुख महंम्मद तडवी,मुख्याध्यापिका विजया पाटील,उपशिक्षक शेखर तडवी यांनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या बाबत व शिक्षक दिनाचे महत्व याविषयी मनोगतातून माहिती दिली.यावेळी कुंदन चव्हाण या चौथीच्या विद्यार्थ्याने मुख्याध्यापकाची भूमिका साकारली.तर इ.३ रीच्या विद्यार्थिनी आम्रपाली आढाळे,पायल राणे व चौथीच्या विद्यार्थिनी परवीन तडवी,तपस्सुम तडवी,चैताली धनगर,धनश्री राणे,सिमरन तडवी या विद्यार्थिनींनी शिक्षिकांची भुमिका साकारून १ ली ते चौथी पर्यंतचे वर्ग सांभाळून मुलांना शिकविण्याचे कामही केले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाल्याचे दिसून आले.