यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील डोंगर कठोरा येथील जिल्हा परिषद मराठी मुला-मुलींच्या शाळेत आज दि.६ डिसेंबर २२ मंगळवार रोजी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले.
यानिमित्ताने आयोजित सभेच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब आढाळे हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच नवाज तडवी,उपसरपंच धनराज पाटील,केंद्र प्रमुख महंम्मद तडवी,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अनिल पाटील,खुशाल कोळी,सुरेश झांबरे,ज्योती सोनवणे उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ.भीमराव रामजी आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार व पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले.प्रसंगी विद्यार्थिनी आम्रपाली आढाळे व पायल राणे तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब आढाळे,ग्रा.पं.सदस्य व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य दिलीप तायडे,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अनिल पाटील, उपशिक्षक शेखर तडवी यांनी डॉ.बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जीवन कार्याविषयी तसेच त्यांनी संपूर्ण भारत देशासाठी दिलेले योगदान,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी उसळलेला जनसागर,त्यांच्या निधनामुळे समाजबांधवांना झालेले दुःख याविषयी माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापिका विजया पाटील यांनी केले तर आभार उपशिक्षक शेखर तडवी यांनी मानले.