Just another WordPress site

महाराष्ट्र-कर्नाटक एसटी सेवा तूर्तास बंद; १४५ बस फेऱ्या रद्द

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
बेळगावमधील हिरे बागेवाडी टोल नाक्याजवळ कन्नड संघटनांकडून महाराष्ट्रातील ट्रकवर दगडफेक करण्यात आली.या आंदोलनाचा एसटीच्या सेवांवरही परिणाम झाला.महाराष्ट्रातील विविध भागांतून कर्नाटकात जाणाऱ्या आणि येणाऱ्या १४५ एसटी फेऱ्या मंगळवारी रद्द करण्यात आल्या.कोल्हापूर,सातारा,सांगली,रत्नागिरी यांसह अन्य काही जिल्ह्यांतून कर्नाटकसाठी दररोज ३३० एसटी फेऱ्या होतात.तेवढय़ाच फेऱ्या पुन्हा कर्नाटककडे रवाना होतात.कन्नड संघटनांकडून करण्यात आलेल्या आंदोलनामुळे एसटीच्या वाहतुकीवर परिणाम झाला.एकूण १४५ एसटी फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या परिवहन सेवाही थांबवण्यात आल्या आहेत.

गोव्याहून मुंबईसाठी येणाऱ्या खासगी प्रवासी बसवर मंगळवारी बेळगावजवळ दगडफेक करण्यात आल्याची माहिती मुंबई बस मालक संघटनेचे अध्यक्ष हर्ष कोटक यांनी दिली.प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन गोव्याला जाणाऱ्या किंवा तेथून येणाऱ्या बस या कोल्हापूरमधील राधानगरी आणि गगनबावडा मार्गे वळवण्यात आल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.