Just another WordPress site

“गुजरातच्या विजयात महाराष्ट्रातून पळवलेल्या उद्योगाचेही योगदान”-उद्धव ठाकरे यांची टीका

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह भाजपाच्या नेत्यांकडून महाराष्ट्रातील महापुरुषांविरोधात होत असलेली वादग्रस्त विधाने,सीमावादाचा मुद्दा आणि राज्याबाहेर गेलेले प्रकल्प यासह विविध मुद्यांवरून महाविकास आघाडी आक्रमक झाल्याचे बघायला मिळते आहे.याविरोधात महाविकास आघाडीकडून १७ डिसेंबर रोजी मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.दरम्यान या पार्श्वभूमीवर काल अजित पवारांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात होती.याबैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषेदत बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे-भाजपावर जोरदार टीका केली.सातत्याने महाराष्ट्राच्या महापुरुषांचा अवमान केला जात आहे. महाराष्ट्राचे अस्तित्व नाकारण्यात येत आहे.एका बाजुने महाराष्ट्र तोडण्याचे काम सुरू आहे.महाराष्ट्राच्या गावांवर आता बाजुच्या राज्यांनी हक्क सांगायला सुरुवात केली आहे.या विरोधात १७ डिसेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे.या मोर्चाची सुरुवात जिजामाता उद्यानापासून होईल आणि सीएसटीपर्यंत हा मोर्चा असणार आहे मला खात्री आहे की आहे की हा मोर्चा न भूतो ना भविष्यते असा होणार आहे अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

गेल्या वेळी गुजरात हिमाचल आणि दिल्ली महापालिका या तीन निवडणुका झाल्या तेव्हा भाजपाने विजय मिळवला होता मात्र यंदा हिमाचलमध्ये काँग्रेस दिल्ली महापालिकेत आप आणि गुजरातमध्ये भाजपाने अभूतपूर्व यश मिळवले आहे.मात्र आपण एक लक्षात घेतल पाहिजे की गुजरातच्या विजयात महाराष्ट्रातून पळवलेल्या उद्योगाचेही योगदान आहे हे विसरून चालणार नाही अशी टोलाही त्यांनी लगावला.गुजरातच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन ज्याप्रकारे महाराष्ट्रातील उद्योग पळवण्यात आले त्याप्रकारे कर्नाटकची निवडणूक डोळ्यासमोर घेऊन महाराष्ट्रातील गावेही तोडतील की काय?अशी भिती निर्माण झाली आहे.त्यामुळे वेळीच महाराष्ट्रद्रोह्यांना आवरले नाही तर महाराष्ट्र छिन्न-विछिन्न करायलाही हे मागेपुढे बघणार नाही.त्यांच्या मनात जे विष आहे ते आता जगजाहीर झाले आहे त्यामुळे जे महाराष्ट्र प्रेमी आहेत त्यांनी १७ तारखेला मोर्चात सहभागी व्हावे असे आव्हानही त्यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.