पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पैठणमधील एका कार्यक्रमात महात्मा फुले,कर्मवीर भाऊराव पाटील,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात जोरदार राजकारण तापले आहे.काल पिंपरी-चिंचवड येथे समता दलाच्या कार्यकर्त्यांकडून शाई फेक झाल्यानंतर आज पुण्यातील ससून रुग्णालयाजवळ चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे.काल पिंपरी-चिंचवडमधल्या शाईफेकीनंतर अनेक आंबेडकरवादी संघटना आक्रमक झाल्या असून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चंद्रकांत पाटील यांना अटक करा या मागणीसाठी लाक्षणिक उपोषण सुरु केले आहे.परंतु त्यापूर्वीच ससून हॉस्पिटलजवळ एक बॅनर लागलेला आहे जो बॅनर सध्या पुण्यात चर्चेचा विषय ठरत आहे.