यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील साकळी येथील एका २० वर्षीय तरूणीला एका अज्ञात तरुणाकडुन मोबाईलवर व्हाट्सअप द्वारे वारंवार संदेश पाठवुन व विचारणा केल्यावरून अश्लील शिवीगाळ करणाऱ्या विरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की,साकळी येथे राहणाऱ्या एका २० वर्षीय तरूणीला ९५२९०२२५८५ या व्हाट्सअप क्रमांकाच्या मोबाइलवरून एका अज्ञात मोबाइलधारकाकडुन वारंवार संदेश पाठवले या संदर्भात तरूणीने सदरील संदेश पाठवणाऱ्यास त्याचे नांव विचारले असता त्या संदेश पाठवणाऱ्या तरुणाकडुन तरूणीस अश्लील शिवीगाळ करीत विनयभंग करण्यात आला आहे.या वारंवार येणाऱ्या संदेशांमुळे डोकेदुखी वाढल्याच्या त्रासाला कंटाळुन अखेर साकळीच्या त्या तरूणीने यावल पोलीस ठाण्यात त्या संदेश पाठवणाऱ्या अज्ञात तरुणा विरूद्ध फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास यावलचे पोलीस निरिक्षक राजेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक प्रदीप बोरूडे व पोलीस करीत आहेत.