नागपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मात्र या कार्यक्रमावर आम्ही बहिष्कार घालत असल्याची अजित पवार म्हणाले होते.आम्हाला चहापणाला उपस्थित रहा असे सांगितले मात्र सहा महिने सरकार सत्तेवर आले आहे मात्र जनतेच्या अपेक्षा यांनी पूर्ण केलेल्या नाहीत.अनेक मंत्री,आमदार महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करत आहेत.सीमा प्रश्नाबाबत देखील अजून पुरेशी उपाययोजना केलेली नाही.८६५ गावांचा प्रश्न अजून कायम आहे.काही गावे इतर ठिकाणी जाण्यासाठी ठराव करू लागली आहेत अशी टीकाही अजित पवार यांनी केली होती.दरम्यान अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच वाहतूक व्यस्थेतही अनेक बदल करण्यात आले आहे.विधानभवन परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी वाहतूक पोलीस उपायुक्त कार्यालयातून पासेस घ्याव्यात,वॉकर स्ट्रीटवर मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांनी आपली वाहने पोलीस जिमखानाजवळील पुलाजवळून पुढे सीपी क्लब या मार्गावर उभी करावी,विधानभवन परिसरात काम करणाऱ्या अधिकारी,कर्मचाऱ्यानी ओळखपत्र सोबत बाळगावे अशा सुचनादेखील पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत.