Just another WordPress site

माता भीमाबाई रामजी सकपाळ किंवा भीमाबाई आंबेडकर स्मृतीदिन विशेष

भीमाबाई रामजी सकपाळ
Bhimabai Ramji Sakpal (Ambedkar).jpg
भीमाबाई सकपाळ (आंबेडकर)
टोपणनाव: भीमाई
जन्म: १४ फेब्रुवारी १८५४
आंबेटेंभे (ता. मुरबाड)
मृत्यू: २० डिसेंबर १८९६
वडील: लक्ष्मण मुरबाडकर
पती: रामजी मालोजी आंबेडकर
अपत्ये: डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भीमाबाई रामजी सकपाळ किंवा भीमाबाई आंबेडकर या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आई व सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या पत्नी होत्या.त्यांचे वडील लक्ष्मण मुरबाडकर हे आधी मराठा पलटणीत व नंतर १०६ सॅपर्स ॲंन्ड मायनर्समध्ये सुभेदार होते.इ.स. १८६७ मध्ये वयाच्या १३ व्या वर्षी भीमाबाईंचा विवाह १९ वर्षीय रामजी सकपाळ यांच्याशी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे विवाह झाला.इ.स.१८६६ च्या सुमारास रामजी इंग्रजी सैन्याच्या १०६ सॅपर्स अँड मायनर्स तुकडीत शिपाई म्हणून भरती झाले.भीमाबाईंचे वडील मुरबाडचे राहणारे होते व ते इंग्रजी सैन्यात सुभेदार या पदावर होते.

संत गाडगे बाबा Sant... - संत गाडगे बाबा Sant Gadge Baba        ????संत गाडगे महाराज पुण्यतिथी Images Sarthak Tarange - ShareChat - अस्सल  भारतीय सोशल नेटवर्क

रामजी व भीमाबाई या दांपत्यांना १८९१ पर्यंत चौदा अपत्य झाली होती.त्यापैकी गंगा,रमा,मंजुळा व तुळसा या चार मुली जीवंत राहिल्या होत्या. मुलांपैकी बाळाराम,आमंदराव व भीमराव ही तीन मुले जिवंत होती.भीमराव सर्वात लहान व चौदावे अपत्य होता.रामजी ज्या पलटणीत होते ती पलटन इ.स. १८८८ मध्ये मध्य प्रदेशातील महू येथे लष्करी तळावर आली होती.येथे सुभेदार रामजींना नॉर्मल स्कूलचे मुख्याध्यापक पद मिळाले होते.या काळात रामजी व भीमाबाईंच्या पोटी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी महू या लष्करी छावणी असलेल्या गावी झाला.भीमराव हे रामजी सकपाळ व आई भीमाबाई यांचे १४ वे तसेच अंतिम अपत्य होते.बाळाचे नाव ‘भिवा’ असे ठेवण्यात आले तसेच त्यांची भीम,भीमा व भीमराव ही नावेही प्रचलित झाली.आंबेडकरांचे कुटुंब हे त्याकाळी अस्पृश्य (दलित) गणल्या गेलेल्या महार जातीचे होते आणि महाराष्ट्रातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे या गावचे होते.अस्पृश्य असल्यामुळे त्यांच्यासोबत नेहमी सामाजिक-आर्थिक भेदभाव केला गेला. इ.स. १८९४ मध्ये सुभेदार रामजी सकपाळ इंग्रजी सैन्यातील मुख्याध्यापक पदाच्या नोकरीवरून निवृत्त झाले आणि महाराष्ट्रातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील आपल्या मूळ गावाजवळीत दापोली या गावातील ‘कॅम्प दापोली’ वस्तीत परिवारासह राहू लागले.इ.स. १८९६ मध्ये रामजींची आपल्या कुटुंबासह दापोली सोडली व सातारा येथे राहिले.यावर्षीच त्यांनी कबीर पंथाची दीक्षा घेतली.इ.स.१८९६ मधे मस्तकशूळ या आजाराने भीमाबाईंचे निधन झाले त्यावेळी आंबेडकर ५ वर्षाचे होते.

Leave A Reply

Your email address will not be published.