यावल-पोलीस नायक(प्रतिनीधी):-
तालुक्यातील किनगाव येथील रहीवासी व राज्य अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त व इंग्लिश मेडीयम निवासी पब्लिक स्कुल किनगावचे चेअरमन विजयकुमार देवचंद पाटील यांचा ७१ वा वाढदिवस इंग्लिश मेडीयम निवासी पब्लिक स्कुलमध्ये साध्या पद्धतीने व विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.स्कुलच्या भव्य प्रांगणावर संपन्न झालेल्या या कार्येक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजयकुमार पाटील हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील सेवानिवृत्त प्राचार्य सर्जेराव पाटील (किनगावकर) यांच्यासह सौ.शैलेजाताई विजयकुमार पाटील इंग्लिश मेडीयम स्कुलचे सचिव व स्व.केतन मल्टिपर्पज फाऊंडेशनचे अध्यक्ष मनिष विजयकुमार पाटील व्यवस्थापक सौ.पुनम मनिष पाटील,सेवानिवृत्त शिक्षक व यावलचे जेष्ठ सामाजीक कार्यकर्त वसंतराव पाटील,किनगावचे सामाजीक कार्यकर्ते डाँ.विजय बोरसे,एकनाथ मामा,पंडीत गुरूजी,प्राचार्य अशोक प्रतापसिंग पाटील,उप प्राचार्य सौ.राजश्री सुभाष अहीरराव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थीत होते.
यावेळी उपस्थीत मान्यंवरांनी विजय नाना यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले.तर विजयकुमार पाटील यांनी सत्कारार्थी मनोगत व्यक्त करतांना आपल्या बालवयापासून ते राज्याच्या अंन्न व औषध प्रशासनातुन सहाय्यक आयुक्त पदावरून सेवानिवृत्त होईपर्यंतच्या जिवनाच्या खडतर प्रवासा बाबत माहिती सांगितली.यावेळी स्कुलच्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या आगळ्या वेगळया सत्कारांनी विजय नाना हे अत्यंत भावुक झाले होते तर दिवसभर विजुनानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यंवरांनी निवासस्थानी व त्यांच्या कार्यालयात भेट घेत शुभेच्छा दिल्या.यावेळी शिक्षक दिलीप बिहारी संगेले,हर्षल भास्कर मोरे,योगीता प्रकाश बिहारी,देवयानी शांताराम सोळुंके,मिलींद उत्तम भालेराव,भावना राजेंन्द्र चोपडे,प्रतिभा रमेश धनगर,अनिल तापीराम बारेला,पवनकुमार विठ्ठल महाजन,संपत विरसिंग पावरा,वैशाली रविंन्द्र धांडे,शाहरूख रशीद खान,प्रतिक एम.तायडे,पुजा डी.शिरोडे,तुषार नामदेव धांडे,नूतन देशमुख,अनिता देशमुख,रामेश्वरी कांबळे,बाळासाहेब पाटील यांचेसह विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थीत होते.या कार्येक्रमाचे प्रास्तावीक पवनकुमार महाजन यांनी केले तर सुत्रसंचालन हर्षल मोरसर यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन प्राचार्य अशोक पाटील यांनी मानले.