Just another WordPress site

निंभोरा सिम सरपंचपदी अनिल अशोक कोळी बिनविरोध

योगेश पाटील

रावेर-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील निंभोरा सिम येथील नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदी अनिल अशोक कोळी यांची बिनविरोध निवडून आले.त्याचबरोबर शोभाबाई संतोष पाटील व  कविता प्रवीण चौधरी हे बिनविरोध सदस्य म्हणून निवडून आले.अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत अपेक्षित व अनपेक्षित निकाल पाहायला मिळाले.

याबाबत सविस्तर असे की,तालुक्यातील निंभोरा सिम गावातील ग्रामपंचायत निवडणुका नुकत्याच पार पडल्या.यात सात जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.सरपंचपदासाठी अनिल अशोक कोळी यांची बिनविरोध निवड झाली तर शोभाबाई संतोष पाटील तसेच कविता प्रवीण चौधरी हे दोन सदस्य बिनविरोध निवडून आले.जनार्दन नारायण वरणकर यांना १२९ मते,किरण चौधरी यांना २८३ मते,दिलीप बाबुराव सवर्णे यांना १६० मते,रत्‍नाबाई सवर्णे  यांना २१९ मते तर उज्वला विकास सवर्णे यांना 120 मते मिळवून ते विजयी झाले.प्रसंगी नारायण मिस्तरी,बाबुराव सवर्णे,गोकुळ पाटील,नगिनलाल सवर्णे,धनराज पाटील,शांताराम चौधरी व सर्व उमेदवार तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्ती  उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.