Just another WordPress site

तापी नदीतील बाह्य पात्रात बुडून युवकाचा मृत्यू

यावल पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद दाखल

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी)-तालुक्यातील पाडळसा येथील रहिवाशी दीपक दिनकर भारंबे वय-३७वर्षे  या युवकाचा अंजाळे  शिवारालगत असलेल्या तापी नदीतील बाह्य पात्रात बुडाल्याने मृत्यु झाल्याची घटना समोर आली आहे.या प्रकरणी यावल पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सदरील मृत्युमुखी पडलेला युवक दीपक दिनकर भारंबे हा  पाडळसा येथील रहिवाशी असुन तो सध्या निमखेडी शिवार,खोटे नगर,जळगाव येथे आपल्या कुटुंबासमवेत वास्तव्याला होता.या युवकाचा अंजाळे शिवारालगत असलेल्या तापी नदीतील बाह्य पाण्याच्या प्रवाहालगत काट्यांच्या झुडपांमध्ये मृतदेह आढळून आला.सदरील युवकाने आत्महत्या केली की पाण्यात बुडून मृत्यू झाला याबाबत कुठलीही माहिती उपलब्ध झालेली नाही.याबाबत यावल पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस नाईक संदीप सुर्यवंशी हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.