यावल-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
तालुक्यातील डोंगर कठोरा येथील जिल्हा परिषद मराठी मुला मुलींच्या शाळेत काल दि.२२ गुरुवार रोजी शासनाच्या निर्देशानुसार निपुण भारत अभियानाअंतर्गत माता पालक मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच नवाज तडवी होते.तर प्रमुख पाहुणे मानून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब आढाळे,उपाध्यक्षा धनश्री धनगर,सदस्य दिलीप तायडे,खुशाल कोळी,केंद्र प्रमुख महंमद तडवी होते.प्रारंभी कार्यक्रमाचे अध्यक्ष नवाज तडवी व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका विजया पाटील यांनी केले.प्रास्ताविकात त्यांनी निपुण भारत अभियानाबाबतचा उद्देश्य विशद केला.तसेच केंद्र प्रमुख महंमद तडवी,सरपंच नवाज तडवी,उपशिक्षक शेखर तडवी यांनी माता पालक मेळाव्याबाबत तसेच निपुण भारत अभियानाची रूपरेषा व महत्व सांगितले.त्याचबरोबर माता पालकांनी आपल्या पाल्यांचा अभ्यास घरी घेण्यावर भर देण्याचे आवाहन केले.
यावेळी सरपंच नवाज तडवी,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब आढाळे,उपाध्यक्षा धनश्री धनगर,शाळा व्यवस्थापन समिती व ग्रा.पं.सदस्य दिलीप तायडे,शाळा व्यवस्थापन समिती खुशाल कोळी,केंद्र प्रमुख महंमद तडवी,पालक भास्कर पाटील,अनिल तायडे,प्रशांत वाघ,विकास कोल्हे,फिरोज तडवी,मुबारक तडवी,संजय बऱ्हाटे यांच्यासह माता पालक बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार उपशिक्षक शेखर तडवी यांनी मानले.