खासदार राहुल शेवाळे यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा मुद्दा लोकसभेत उपस्थित केल्यानंतर त्याचे पडसाद विधिमंडळातदेखील दिसून आले.गेले दोन दिवस या मुद्द्यावरून विधानसभेत गदारोळ झाल्याचे बघायला मिळाले अखेर देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी एसआयटी चौकशीचे निर्देश दिले तसेच या प्रकरणाची चौकशी सीबीआयने केली नव्हती असेही ते म्हणाले.दरम्यान फडणवीसांनी सभागृहाला खोटी माहिती दिली असून दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सीबीआयने केलेल्या तपासाचा अहवाल आमच्याकडे आहे.त्यामुळे आम्ही सोमवारी फडणवीसांवर हक्कभंग आणणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.एबीपी माझाशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.काल विधानसभेत नागपूर एनआयटीच्या घोटाळ्याचा मुद्दा पुढे आला आहे.याबाबतची याचिका फडणवीस यांनीच दाखल केली होती मात्र राज्यात सत्ताबदल होताच त्यांनी ही याचिका मागे घेतली.याचाच अर्थ एकनाथ शिंदे यांनी हा घोटाळा केला हे सिद्ध होतआहे. तसेच रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणी सुद्धा देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यानंतर गुन्हा रद्द करण्याचा प्रयत्न झाला आणि क्लोजर रिपोर्ट न्यायालयात पाठवण्यात आला.त्यावर न्यायालयाने काल ताशेरे ओढले.हा मुद्दाही मी विधानसभेत उपस्थित केला होता हे दोन्ही मुद्दे बघितले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पदाचा दुरुपयोग केल्याचे सिद्ध होते आहे त्यामुळे दिशा सालियांच्या मृत्यूचा मुद्दा काढण्यात आला अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.
सीबीआयने दिशा सालियन आणि सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूचा तपास केला होता याबाबतची तक्रार नारायण राणे यांनी केली होती.या तपासाचा अहवाल आमच्याकडे आहे मात्र फडणवीस म्हणतात की दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयने केला नाही. सभागृहाला खोटी माहिती देणे हा सभागृहाचा अवमान आहे त्यामुळे आम्ही सोमवारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हक्कभंग आणणार अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.दरम्यावेळी बोलताना सीमावादाच्या मुद्द्यावरूनही त्यांनी भाजपावर टीकास्र सोडले.मी सुरुवातीपासून सांगतो आहे.केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर महाराष्ट्राचे तुकडे करण्याचे काम भाजपाकडून सुरू आहे.मात्र महाराष्ट्राचे सरकार या संदर्भात गप्प बसले आहे त्यामुळे अमित शहांबरोबर झालेली बैठक महाराष्ट्राचे तुकडे करण्यासाठी होती असे म्हटले तर वावगे ठरणार नाही अशी टीका नाना पटोले यांनी केली.