यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील डोंगर कठोरा येथे एसएससी बॅच १९७२ च्या विद्यार्थ्यांचा सुवर्ण महोत्सव सोहळा अर्थात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा आज दि.२५ डिसेंबर २२ रविवार रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.प्रसंगी माजी विद्यार्थी विद्यार्थिनींच्या तर्फे गुरुजनांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसएससी बॅच १९७२ मध्ये पहिल्या नंबरने पास झालेला विद्यार्थी दिनकर केशव जावळे या विद्यार्थ्याची निवड करून आयोजकांनी उपस्थितांची मने जिंकली.तर प्रमुख पाहुणे म्हणून अरुणोदय शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष डॉ.राजेंद्रकुमार झांबरे,उपाध्यक्ष राजाराम राणे,ह.भ.प.दिनकर पाटील महाराज,महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डी.जी.भोळे,अ.ध.चौधरी विद्यालयाचे मुख्याध्यापक नितीन झांबरे,सेवानिवृत्त शिक्षक सुदाम राणे,जी.डी.सरोदे,व्ही.ए.पाटील,शरद राणे हे होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी अच्युत धनाजी चौधरी विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले.प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीपूजन करण्यात आले व उपस्थित मान्यवर व गुरुजन वर्ग यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सेवानिवृत्त शिक्षक सुदाम राणे,ह.भ.प.दिनकर पाटील महाराज,जी.डी.सरोदे,पी.एस.लोखंडे,डॉ.राजेंद्रकुमार झांबरे,कार्यक्रमाचे अध्यक्ष दिनकर जावळे यांनी ‘गेट टुगेदर’कार्यक्रमाचे महत्व,सेवानिवृत्ती नंतरचे कार्य व जबाबदारी,सेवानिवृत्तीनंतर विद्यार्थ्यांचे कार्य,विद्यार्थी दशेतील जीवन व वाटचाल,गेट टुगेदर कार्यक्रमाचा अर्थ व महत्व याबाबत माहिती सांगितली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मेघश्याम फालक यांनी केले तर आभार दिनकर टिकाराम पाटील यांनी मानले.कार्यक्रमाची सांगता महाराष्ट्र गीत व पसायदान म्हणून करण्यात आली.
प्रसंगी मेघश्याम फालक,नरेंद्र राणे,गिरधर राणे,दिनकर लोखंडे,उषा सखाराम पाटील,कुमुदिनी भोळे,पद्मिनी झांबरे,रमेश राणे,जगन्नाथ पाटील,नारायण खडसे,पुरुषोत्तम लोखंडे,वासुदेव भिरूड,रेवानंद राणे,मंजुळा ठोंबरे,उषा सरोदे,उषादेवी राणे,मुरलीधर पाटील,दिनकर टिकाराम पाटील,वामन राणे,मधुकर सरोदे त्यांच्यासह विद्यार्थ्यांच्या पत्नी व विद्यार्थिनींचे पती यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते.