यावल तालुका पोलिस पाटील संघाची नुतन कार्यकारिणी जाहीर
यावल तालुका अध्यक्षपदी निलेश सोनवणे तर सचिवपदी राजरत्न आढाळे यांची निवड
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
यावल तालुका पोलिस पाटील संघाची नुतन कार्यकारिणी पोलीस पाटील संघटना राज्य उपाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांच्या अध्यक्षतेखाली
येथील तालुका खरेदी विक्री संघातील कार्यालयात महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलिस पाटील संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली.यावेळी यावल तालुका पोलिस पाटील संघाची नुतनकार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
कार्यकारणी पुढीलप्रमाणे निवडण्यात आलेली आली.यावल तालुका पोलिस पाटील तालुका अध्यक्ष निलेश बन्सिधर सोनवणे रिधुरी,
तालुका उपाध्यक्ष गणेश साहेबराव पाटील चुंचाळे,सचिव राजरत्न राहुल आढळे डोंगरकठोरा,कार्याध्यक्ष चंद्रकांत देविदास पाटील विरावली,
सोशियल मिडिया प्रमुख सचिन हिरालाल तायडे भालशिव,सदस्य महेमूद तडवी मोहराळे,अरूण पाटील चिखली,गोकुळ एकनाथ शंकोपाळ बोरावल बु,कैलास बादशाह कासवा तसेच जिल्हा कार्यकारिणी जिल्हा उपाध्यक्ष पवन हेमंत चौधरी अट्रावल,जिल्हा संघटक सुरेश वामन खैरनार पाडळसा,महिला जिल्हाकार्यध्यक्ष सौ.प्रफुल्ला गोटुलाल चौधरी म्हैसवाडी यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी वार्षिक सर्वसाधारण सभेस तालुक्यातील सर्व पोलिस पाटील बंधु भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.