यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.यानिमित्ताने विद्यार्थिनी कुमुद भालेराव हिच्या हस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले.या अभिवादन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयातील प्राध्यापक अरुण सोनवणे हे होते.
सदर कार्यक्रम महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला तर कार्यक्रमाचे आयोजन उपप्राचार्य ए.पी. पाटील यांच्या सहकार्याने करण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरूवातीस थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन केल्यानंतर विद्यार्थिनी खुशी लहाने हिने आपले मनोगत व्यक्त करून सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित गाणे सादर केले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.अरूण सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांनी शिकले पाहिजे अशी संकल्पना मांडली तसेच सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला,स्त्री शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन त्यांनी महिलांसाठी शिक्षणाची दारे खुले करून दिले,स्त्री शिक्षणाची बीजे रोवली,विद्यार्थिनींनी अजूनही मागे न राहता क्रांतीज्योती यांची स्त्री शिक्षणाची ज्योत पुढे न्यावी असे आवाहन केले.कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा.गणेश जाधव यांनी सावित्रीबाई फुले यांनी समाजातील लोकांच्या अतोनात अवहेलना सोसून स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवली,त्यांचे कर्तुत्व महान होते,त्या प्रचंड क्षमतावान होत्या.यांच्याच त्यागातून स्त्री-शिक्षणाच्या त्या महादेवी बनल्या असे विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.आर.डी.पवार यांनी केले तर आभार प्रा.मनोज पाटील यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.सी.के.पाटील, प्रा.संजीव कदम,प्रा.तडवी सर यांनी परिश्रम घेतले.