राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा करण्याऐवजी पक्षांतर्गत मतभेदांबाबत चिंता करायला हवी
राज्याचे महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राहुल गांधी यांच्यावर निशाणा
जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-राजीव गांधी यांनी केंद्र सरकारविरोधात काँग्रेस च्या वतीने भारत जोडो यात्रा सुरु केली आहे. या यात्रेच्या रूपाने राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा करण्याऐवजी काँग्रेस छोडोचा कार्यक्रम सुरु केला आहे अशी खिल्ली राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भारत जोडो यात्रेची उडविली आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे जनावरांवरील लॅम्पची स्किन आजाराच्या पाहणीकरिता जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले आहेत.यावेळी प्रसार माध्यमांशी बोलतांना त्यांनी हि टीका केली आहे.
केंद्रातील सरकारविरोधात भारत जोडो यात्रेनिमित्त सुमारे १२ राज्यांमधून ३५०० किलोमीटर लांबीचा प्रवास करणार आहे.सत्तेचा सर्वोच्च अनुभव घेतलेल्या काँग्रेसची आताच्या घडीला फारच दयनीय स्थिती झाली आहे.त्यात पक्ष अंतर्गत मतभेद व बाह्य संघर्षाचा सामना काँग्रेस ला करावा लागत आहे.त्यामुळे राजीव गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढण्यापेक्षा पक्षतील मतभेदांची आधी चिंता करावी .तसेच भारत जोडो यात्रेनिमित्त गांधी घराण्यातील कुटूंब वाचविण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
सत्ता वैफल्यातून अनेक विरोधी पक्षतील मंडळी राज्य सरकारवर टीका करीत आहेत मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार योग्य दिशेने वाटचाल करीत आहे व चांगले निर्णय घेत आहे.सरकार म्हणून आम्ही जनतेची जबाबदारी स्वीकारली असून मागील सरकार प्रमाणे आम्ही माझे कुटुंब तांची जबाबदारी याप्रमाणे वागणार नाही असेही राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांना खडसावून सांगितले आहे .