Just another WordPress site

विजेच्या धक्क्यामुळे महिलेचा मृत्यू:दोन महिन्यानंतर गुन्हा नोंद

चोपडा-पोलीस नायक (प्रतिनिधी):-

चोपडा शहरात दोन महिन्यापूर्वी वीज तारांमुळे विजेचा जोरदार धक्का लागल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती.या प्रकरणी काल सोमवार दि.९ रोजी मृत विवाहितेच्या भावाने चोपडा पोलिसात महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केल्यामुळे खळबळ उडाली आहे.अनिता महेंद्र अहिरे वय ३५ वर्षे रा.शेतपुरा चांभारवाडा,चोपडा असे मृत विवाहितेचे नाव आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की,चोपडा शिवारातील हॉटेल जयेशच्या मागे महाराष्ट्र राज्य वीज कंपनीच्या ११ के.व्ही विद्युत तारा या जमिनीपासून फारच जवळ होत्या सदरील तारांचे अंतर नियमापेक्षा फारच कमी होते.महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी चोपडा यांनी विद्युत संच मांडणीवर योग्य निगा व देखभाल तसेच दुरुस्ती न केल्यामुळे १५ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास अनिता महेंद्र अहिरे यांचा कचरा वेचत असतांना जमिनीलगत आलेल्या विद्युत तारांना धक्का लागल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.सदरील घटनेस महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी चोपडा यांचे संबंधित अधिकारी व कमर्चारी जबाबदार असल्याची फिर्याद मयत महिलेचा चुलत भाऊ विजय अशोक खजुरे वय ३१,रा.शेतपुरा,चोपडा यांनी चोपडा शहर पोलीसात दिली आहे.त्यानुसार चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक संतोष पारधी हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.