यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील किनगाव येथील कला व वाणिज्य महाविद्यालयातील गरजु विद्यार्थ्यांना आदीवासी समाज संचलीत अमीर प्रतिष्ठान या समाजसेवी संस्थेच्या वतीने इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना अपेक्षीत संचाचे वाटप नुकतेच करण्यात आले.
यावल तालुक्यातील किनगाव येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात संपूर्ण विश्वात आपल्या भारताची प्रतिमा उंचवणारे कुशल नेतृत्व लाल बहादूर शास्त्री यांच्या ५७ व्या पुण्यतिथी निमित्त अमीर प्रतिष्ठान संचलित अमीर प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून संस्थाध्यक्ष हाजी रमजान अमीर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे कार्याध्यक्ष संचालक सचिन तडवी यांच्या हस्ते अत्यंत गरीब व अति दुर्गम भागातील इयत्ता १o वीच्या वर्गात शिकत असलेल्या आदिवासी व इतर विद्यार्थ्यांना मोफत अपेक्षीत संचाचे वाटप नुकतेच करण्यात आले.मागील कित्येक वर्षापासुन सचिन तडवी हे आपल्या संस्थेच्या माध्यमातून सातत्याने हा कार्यक्रम राबवित आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार रमेश चौधरी हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख सचिन तडवी होते.उमाकांत पाटील नूतन मराठाचे संचालक व माजी उपसभापती विद्यार्थ्यांना यशस्वीतेविषयी व पुढील शैक्षणिक वाटचाली संदर्भात महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.आमदार रमेश चौधरी यांनी अध्यक्षीय भाषण केले.प्रसंगी प्रगतशील शेतकरी चंद्रकांत चौधरी,माध्यमिक विद्यालयाचे चेअरमन नीलकंठ पाटील,किनगाव सरपंच संजय पाटील,मा.सरपंच टिकाराम चौधरी,भूषण पाटील,डॉ.योगेश पालवे,समीर तडवी,विजय अरुण वारे,कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन एस.बी.सोनवणे सर यांनी केले व आभार जावेद तडवी सर यांनी केले.कार्यक्रम प्रसंगी अमीर प्रतिष्ठान संचलित कला व वाणिज्य महविद्यालयाचे संचालक अजित तडवी,रफिक तडवी,संचालक मंडळ व पालक,शाळेचे विध्यार्थी,शाळेच्या प्र.मुख्याध्यापिका,पाटील मॅडम लिपिक अब्दुल तडवी,कोळी सर आणि सर्व शिक्षक वृंद,पंचक्रोशीतील शिक्षण प्रेमी व ग्रामस्थ मंडळी यांची उपस्थिती राहिली.