Just another WordPress site

माहिती अधिकारात माहिती मागितल्याच्या रागातून पत्रकारासह दोघांवर गुन्हा दाखल ?

एक लाख रुपयांची खंडणी मागणीतल्या प्रकरणी गुन्हा दाखल व अटक

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

दत्तक पत्र तसेच नावे केलेले शेत जमिनीचे कागदपत्र खोटे बनवून देतो असे सांगत एक लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी येथील पत्रकार व इतर एका व्यक्तीच्या विरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.येथील शहरातील पूर्णवाद नगरमध्ये रहिवाशी असलेले इरफान इस्माईल तडवी यांच्या पत्नीचे दत्तक प्रकरण तसेच तिचे नावे दत्तक वडिलांनी करून दिलेले शेतीचे प्रकरण खोटे व गंभीर असल्याचे सांगत सदरील प्रकरण दाबण्यासाठी येथील साईमतचे पत्रकार सुरेश पाटील व विरावली येथील संजय उत्तम पाटील यांनी इस्माईल तडवी यांचेकडे एक लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याची फिर्याद इस्माईल तडवी यांनी दिल्यावरून दोघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोन्ही संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलीस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की,येथील पूर्णवाद नगरातील रहिवासी इरफान इस्माईल तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार माझी पत्नी परविन हिस सुभान अमीर तडवी यांना मुलगा नसल्याने त्यांच्या साळूची मुलगी तथा माझी पत्नी परविन हिस दत्तक घेतले.त्यानंतर बऱ्याच वर्षानंतर त्यांनी ३०जुलै २१ रोजी तहसीलदार यांचे कार्यालयात त्यांची यावल शिवारातील शेत गट नंबर २२८३ क्षेत्र दोन हेक्टर ०२ आर ही सुभान तडवी यांचे नावे असलेली शेत जमीन त्यांची दत्तक मुलगी तथा माझी पत्नी परविन हीस नातेवाईक व पंच मंडळी समक्ष दत्तक घेत तहसीलदार यांचे कडे अधिनियम १९६६ ते कलम ८५ नुसार कुटुंब वाटणी पत्र तयार केले व परविन हिस ७/१२ मध्ये समाविष्ट केले.१ जानेवारी २३ रोजी आठ वाजेच्या सुमारास इरफान तडवी यांना संजय उत्तम पाटील यांनी फोन करून यावल येथील त्यांच्या मोटर गॅरेजवर बोलाविले त्यावेळी तेथे गॅरेज चालक संजय पाटील व पत्रकार सुरेश पाटील यांनी इरफान तडवी यांना सांगितले की तुझ्या पत्नीचे दत्तक प्रकरण व शेतजमिनीचे प्रकरण हे आम्हाला माहीत झालेले आहे व हे प्रकरण आम्ही बाहेर काढले तर तुझ्या पत्नीला,सासर्‍याला, व तहसीलदार यांना महागात पडेल हे प्रकरण दाबण्यासाठी एक जानेवारी ते ९ जानेवारी दरम्यान या दोघांनी वेळोवेळी मोबाईलवर फोन करून एक लाख रुपयांची मागणी केली.एक लाख रुपये जमत नसतील तर वृत्तपत्रात बातमी छापून तुझी बदनामी करेल अशी धमकी या दोघांनी दिली.अशा आशयाच्या फिर्यादीवरून येथील पत्रकार सुरेश पाटील व संजय उत्तम पाटील या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

माहिती अधिकारात माहिती मागितल्याच्या राग

पूर्णवाद नगरातील रहिवासी इरफान इस्माईल तडवी यांच्या पत्नी परवीन यांचे दत्तक प्रकरण व शेत जमिनीच्या प्रकरणाची माहिती आपण माहिती अधिकारात मागितल्याने इरफान तडवी यांना राग आल्याने त्या रागातूनच त्यांनी ही फिर्याद दाखल केली आहे.अशी प्रतिक्रिया पत्रकार सुरेश पाटील यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.