रावेर-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
रावेर येथील जिजाऊ नगरमध्ये काल दि.१२ जानेवारी बुधवार रोजी राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून तसेच दीप पूजा करून उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.
यानिमित्त जिजाऊ नगरमध्ये आयोजित या अभिवादन कार्यक्रमानिमित्ताने राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून तसेच दीप पूजा करून उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कामगार नेते दिलीप कांबळे,शिवसेना रावेर शहर प्रमुख अशोक शिंदे,रावेर तालुका भाजप सरचिटणीस प्राध्यापक सि.एस.पाटील,वंचित बहुजन आघाडी रावेर तालुकाध्यक्ष बाळू शिरतुरे,ग.स. सोसायटी संचालक निलेश पाटील सर,स्वप्निल पाटील,घनश्याम पाटील,विश्वास पाटील,प्रदीप पाटील, फुले आंबेडकर शाहू बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र अटकाळे,श्रावण पाटील,चंद्रकांत सपकाळे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.