भालोद महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत हिवाळी शिबिराला सुरुवात
डोंगर कठोरा येथे आज रॅली काढून व्यसनमुक्तीसह विविध विषयांवर जनजागृती
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील डोंगर कठोरा येथील कला वाणिज्य व कॅम्प्युटर अप्लिकेशन महिला महाविद्यालयामध्ये कला व विज्ञान महाविद्यालय भालोद राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष हिवाळी शिबिरास दि.१७ जानेवारी २३ पासून सुरुवात करण्यात आली.या शिबिरादरम्यान दि.२२ जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.त्याचाच भाग म्हणून आज दि.१८ जानेवारी २२ रोजी सकाळी ९ वाजता राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या वतीने डोंगर कठोरा गावातून रॅली काढून विविध घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की,कला व विज्ञान महाविद्यालय भालोद यांच्या वतीने डोंगर कठोरा येथील कला वाणिज्य व कॅम्प्युटर अप्लिकेशन महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत दि.१७ जानेवारी २३ ते २३ जानेवारी २३ या कालावधीत विशेष हिवाळी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.सदरील शिबिराच्या निमित्ताने आज दि.१८ जानेवारी बुधवार रोजी डोंगर कठोरा येथे संपूर्ण गावातून लोक जागरण रॅलीचे आयोजन करण्यात आले.या रॅली दरम्यान “धूम्रपान मद्यपान,आयुष्याची धूळधाण”,”मादक द्रव्याची नशा,अनमोल जीवनाची दुर्दशा”,”मुलगा मुलगी एक समान,दोघेही उंचावतील देशाची मान”,”गावो गावी एकच नारा,घरोघरी शौचालय उभारा”,”स्वच्छता असे जेथे,आरोग्य वसे तेथे”अशा विविध घोषणा देऊन व्यसनमुक्ती,स्वच्छ भारत अभियान,पर्यावरण बचाओ,वृक्षसंवर्धन,जल साक्षरता,बेटी बचाओ बेटी पढाओ,अवयवदान,पाणी व्यवस्थापन,तंबाखू मुक्त अभियान,कोविड संसर्गजन्य आजाराविषयी जनजागृती अभियान अशा विविध विषयांवर जनजागृती करण्यात आली.२३ जानेवारी पर्यंत सात दिवस चालणाऱ्या या हिवाळी शिबिरादरम्यान शौचालय निर्मितीसाठी महिला मेळावा,शाळाबाह्य बालकांचे सर्व्हेक्षण,व्यसनमुक्ती,स्वच्छ भारत अभियान,पर्यावरण बचाओ,वृक्षसंवर्धन,जल साक्षरता,बेटी बचाओ बेटी पढाओ,अवयवदान,पाणी व्यवस्थापन,तंबाखू मुक्त अभियान,कोविड संसर्गजन्य आजाराविषयी जनजागृती अभियान व विविध रॅलींच्या माध्यमातून जनजागृती तसेच प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
कार्यक्रम यशस्वितेकरिता प्राचार्या डॉ.सौ.वर्षा नेहेते,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.पी.ए.सावळे,सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.डी.आर.महाजन,महिला कार्यक्रम अधिकारी प्रा,डॉ,सौ.मीनाक्षी वाघुळदे तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक व स्वयंसेविका यांनी परिश्रम घेतले.