पाडळसे येथील हरविलेली मोटर सायकल शोधून देण्यात ग्रामसुरक्षा दलाला यश
ग्रामसुरक्षा दलाची कौतुकास्पद कामगिरी
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील पाडळसे येथील आमश्या नानला बडोले रा.शिरवेल यांच्या मालकीची मोटर सायकल क्रमांक-एम पी-१० एन एफ ६४१७ पाडळसे बस स्टॅन्ड परिसरातून हरविली होती.सदर मोटर सायकल ग्राम सुरक्षा दलाच्या सेवकांना चार दिवसानंतर मोर नदीच्या पात्रातील पुलाखाली आढळून आली.सदरील गाडी मालकाला पाडळसे येथे बोलावून त्याच्या ताब्यात देण्यात आली.हरविलेली मोटर सायकल शोधुन दिल्याबद्दल ग्रामसुरक्षा दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पाडळसे येथील आमश्या नानला बडोले रा.शिरवेल यांनी मोटर सायकल क्रमांक-एम पी-१० एन एफ ६४१७ हि पाडळसे बस स्थानक परिसरात लावलेली होती.मित्रमंडळीसोबत गप्पा करीत असतांना संधीचा फायदा घेऊन हि मोटर सायकल अज्ञात चोरट्यांनी चोरट्यांनी लांबविली होती.परिसरात शोधाशोध करूनही ती मिळून आली नाही.परंतु चार दिवसानंतर येथील ग्राम सुरक्षा दलाचे सेवकांना हि मोटर सायकल मोर नदी पात्राच्या पुलाखाली आढळून आली.हि मोटर सायकल आमश्या बडोले याच्या ताब्यात देण्यात आली आहे.मोटर शोधकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पाटील सुरेश खैरनार,सरपंच ज्ञानेश्वर तायडे,ग्रामसुरक्षा दलाचे अध्यक्ष मनोज तायडे,गणेश कोळी,किशोर महाजन यांनी परिश्रम घेतले.