यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून “परीक्षा पे चर्चा” हा कार्यक्रम ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमाद्वारे राबविण्यात येत आहे.देशातील मुलांना त्यांच्याकडील कौशल्य व विविध सुप्त गुणांना वाव मिळवा याकरिता भारतीय जनता पार्टीच्या वतीने इ.९ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवर आधारित चित्रकला स्पर्धेचे आयोजन नुकतेच करण्यात आले.यात तालुक्यातून प्रथम क्रमांक मिताली व्यंकटेश बारी,द्वितीय क्रमांक मानसी निलेश अमोदकर व तृतीय क्रमांक इशा निलेश गडे या विद्यार्थ्यांना रावेर लोकसभा खासदार रक्षाताई खडसे यांच्या हस्ते ट्रॉफी,प्रशस्तीपत्रक व बक्षीस तसेच उत्तेजनार्थ १० विद्यार्थ्या विद्यार्थीनींना प्रशस्तीपत्रक व बक्षीस वितरीत करण्यात आले.
या चित्रकला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी फक्त इ.९ ते १२ वी स्पर्धकांची नावनोंदणी ऑनलाईन पध्दतीने करण्यात आली.सदरील परीक्षा रावेर लोकसभा क्षेत्रातील चोपडा,यावल,रावेर,भुसावळ,मुक्ताईनगर,बोदवड व जामनेर अशा वेगवेगळ्या तालुक्यात आयोजित करण्यात आली.या स्पर्धेत”एक भारत श्रेष्ठ भारत”,”जी २० जागतिक विश्वगुरु बनविण्याच्या दृष्टीने भारताची वाटचाल”,”आजादी का अमृत महोत्सव”,” सर्जिकल ट्राईक”,”करोना लसीकरणात भारत नं.१”,”पंतप्रधानाच्या जन सेवेच्या विविध योजना”,”स्वच्छ भारत अभियान”,”आत्म निर्भय भारत”, “अंतरराष्ट्रीय योग दिन”,”बेटी बचाव बेटी पढाव”,”चुलीच्या धुराच्या त्रासातून मुक्त महिला”,”मोदींचा संवेदनशील निर्णय” अशा विविध विषयांचा समावेश करण्यात आलेला होता.
यावल येथील शशीकांत सखाराम चौधरी माध्यमिक कन्या शाळा येथे खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थित बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले.यावेळी कृषीउत्पन्न बाजार समिती माजी सभापती तथा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, किसान सेल जिल्हाध्यक्ष नारायण चौधरी,भाजपा तालुका अध्यक्ष उमेश फेगडे,भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष श्रीकांत महाजन, कृषीउत्पन्न बाजार समिती माजी उपसभापती व भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष राफेश फेगडे,जिल्हा परिषद सदस्या सविता अतुल भालेराव,माजी नगरसेवक डॉ.कुंदन फेगडे,पंचायत समिती माजी उपसभापती दिपक अण्णा पाटील,वड्री सरपंच अजय भालेराव,भाजपाचे सरचिटणीस विलास चौधरी,उज्जैनसिंग राजपुत,भाजपा शहराध्यक्ष डॉ.निलेश गडे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते.या पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पी.एस.सोनवणे यांनी केले.या संपुर्ण स्पर्धा यशस्वीतेकरिता भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सागर कोळी,भाजपा युवा मोर्चा तालुका सरचिटणीस व्यंकटेश बारी,भाजपा युवा मोर्चा तालुका सरचिटणीस योगेश खेवलकर,भाजपा युवा मोर्चा यावल शहराध्यक्ष रितेश बारी यांनी परिश्रम घेतले.