Just another WordPress site

“पठाणकोट एक्सप्रेस”बससेवा पुर्वरत सुरू करण्याची परसाडे सरपंच मिना तडवी यांची मागणी

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या चोपडा,यावल तसेच रावेर या तीन तालुक्यांच्या आदीवासी बांधवांकरीता वरदान ठरलेली व सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या ग्रामीण भागातुन धावणारी “पठाणकोट एक्सप्रेस”या नावाने ओळखली जाणारी ही बस सेवा पुर्ववत सुरू करण्यात यावी या मागणीसाठी परसाडे सरपंच मिना तडवी यांनी नुकतीच आगार सहाय्यक वाहतुक अधिक्षक जि.पी. जंजाळ यांची भेट घेतली.

यावल आगारातुन सुमारे दोन ते अडीच वर्षापुर्वी रावेर,यावल व चोपडा तालुक्यातील गाव व पाड्यांवरील आदीवासी बांधवांसाठी “पठाणकोट एक्सप्रेस” ही बस सुरू करण्यात आली होती.परंतु हि बस कोरोना संक्रमणापासून बंद करण्यात आलेली आहे.सदरील बससेवा बंद पडल्याने अतिदुर्गम क्षेत्रात राहणाऱ्या आदीवासी बांधवांना एकमेव दळणवळणाचे प्रमुख साधन असलेल्या व शैक्षणिक दृष्ट्या विद्यार्थ्यांसोबतच प्रवाशांना लाभकारी असलेली हि बस बंदमुळे प्रवाशीवर्ग व विद्यार्थ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.परिणामी ही सुरू करण्यात यावी अशी आग्रही मागणी सातपुडापर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या आदिवासी बांधव व प्रवाशी वर्गाकडून केली जात आहे.सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या आदीवासी बांधवांसाठी चोपडा ते रावेर या मार्गावर धावणारी बायपास बस बंद आल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या आदिवाशी बांधवांना मोठ्या प्रमाणावर अडचणीचा सामना करावा लागत आहे.सदरील बस पूर्ववत सुरु करण्यात यावी व या बस बंदमुळे निर्माण झालेल्या समस्यांची माहीती देण्यासाठी परसाडे गावाच्या लोकनियुक्त सरपंच मिना तडवी यांनी थेट यावल आगार सहाय्यक वाहतुक अधिक्षक जि.पी.जंजाळ यांची भेट घेऊन त्यांनी या विषयावर त्यांच्याशी चर्चा केली.

मागील दोन वर्षातील कोरोना संसर्ग काळात राज्यातील एसटी महामंडळाला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले होते.कोरोनाचा गोंधळ आता संपुष्टात आला असुन यावल आगाराने “पठाणकोट एक्सप्रेस”नावाने ओळखली जाणारी बससेवा पूर्ववत सुरू झाल्यास एसटी महामंडळाच्या उत्पनात भर पडेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.याबाबत परसाडे ग्रामपंचायतीच्या वतीने पुढाकार घेऊन ही बस सुरू करण्याबाबतचा ठराव प्रस्तावित केल्यास त्याचा पाठपुरावा करून आम्ही ती मागणी जळगावचे डीसीकडे प्रस्ताव पाठवून जिल्हा स्तरावरून आदेश प्राप्त झाल्यास ही बस पूर्ववत सुरू करण्यात येईल असे आगार प्रमुख यांच्या कडून सांगण्यात आले आहे.याप्रसंगी परसाडे सरपंच मीना तडवी,यावल एसटी आगार कर्मचारी सलिम तडवी,रज्जाक तडवी,बबलू तडवी,फिरोज तडवी,अकिल तडवी,शशि सपकाळे, पुनमचंद पाटील यांच्यासह आगारातील कर्मचारी उपस्थित होते,

Leave A Reply

Your email address will not be published.