यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील डोंगर कठोरा येथे ७४ वा प्रजासत्ताक दिन ठिकठिकाणी व विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
येथील जिल्हा परिषद मराठी मुलामुलींची शाळेचे ध्वजारोहण केंद्रप्रमुख महंमद तडवी यांच्या हस्ते करण्यात आले.जिल्हा परिषद उर्दू शाळेचे ध्वजारोहण जिल्हा परिषद मराठी मुला-मुलींच्या शाळेच्या मुख्याध्यापिका विजया पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व ज्यु.कॉलेज येथील ध्वजारोहण मुख्याध्यापक नितीन झांबरे यांच्या हस्ते करण्यात आले तर ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहण सरपंच नवाज तडवी यांच्या हस्ते करण्यात आले.प्रसंगी सर्वच ठिकाणी सार्वजनिक राष्ट्रगीत म्हणून राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमांमध्ये “७४ व्या प्रजासत्ताक दिनाचा विजय असो”,”बुंद बुंद किंमती है,पाणी हमारा जीवन है!”,”झाडे लावा,देश वाचवा”अशा विविध घोषणा देऊन प्रजासत्ताक दिनाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व ज्यु.कॉलेज व महिला महाविद्यालय येथे आयोजित कार्यक्रमात माता जिजाऊ,माता सावित्री,माता रमाई,झाशीची राणी व भारत माता यांची सजीव आरास करण्यात आली होती.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व पोलीस नायक मुख्य संपादक बाळासाहेब आढाळे,सरपंच नवाज तडवी,पोलीस पाटील राजरत्न आढाळे,तलाठी वसीम तडवी,ग्रामविकास अधिकारी ए.टी.बगडे,उपसरपंच धनराज पाटील,ग्रा.पं.सदस्य डॉ.राजेंद्रकुमार झांबरे,मनोहर महाजन,जुम्मा तडवी,आशा आढाळे,कल्पना राणे,ऐश्वर्या कोलते,कल्पना पाटील,शकीला तडवी,हेमलता जावळे,शबनम तडवी,शाळा व्यवस्थापन समिती तथा ग्रा.पं सदस्य दिलीप तायडे,सुरेश झांबरे,अनिल पाटील,राहुल आढाळे,सुदाम राणे,एम.ओ.राणे,शरद राणे,महिला महाविद्यालय प्राचार्य डी.जी.भोळे,मुख्याध्यापक नितीन झांबरे,एस.बी.ढाके.कल्याण पाटील,विनोद मोरे,बी.आर.पाटील,विजय वाकेकर,शकुंतला भारंबे,रवींद्र खरे,तुषार पाटील,अरविंद कुरकुरे,ठकसेन राणे,अविनाश झांबरे,दिनकर पाटील,उपशिक्षक शेखर तडवी, एन.व्ही.वळींकर, पी.पी.कुयटे,महादेव जानकर,मनीषा तडवी,शुभांगी नारखेडे,मोहिनी पाटील,डिंपल सरोदे,अमीना तडवी,एस.व्ही.चिमणकारे,विवेक कुलट, सचिन भंगाळे,लुकमान तडवी,सुभाष चव्हाण, लाईनमन अमीन तडवी,सिनिअर टेक्निशियन महेंद्र कुरकुरे,पद्माकर कोळी,मुस्तफा तडवी,कमलाकर राणे,विलास राणे,प्रदीप पाटील,सलीम तडवी,अंगणवाडी आशासेविका चारुलता झांबरे,रेखा बागुल,आशा आढाळे,स्वाती झांबरे,मीनाक्षी राणे,सुनंदा राणे,मदतनीस उषा आदीवाले,जरीना तडवी,सिमा तडवी,नवसाबाई तडवी यांच्या सह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.