यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने अकराव्या राष्ट्रीय मतदार दिना निमित्ताने प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृतीसाठी राष्ट्रीय मतदार दिवस नुकताच साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.ए.पी.पाटील हे होते.सदरील कार्यक्रमात इतिहास विभागातील डॉ.संतोष जाधव यांनी मतदार जागृती संदर्भात विचार मांडले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.ए.पी.पाटील यांनी विद्यार्थ्यांना अठरा वर्षांवरील कोणत्याही व्यक्तीचा मतदानाचा अधिकार हा त्यांचा नैतिक अधिकार असून प्रत्येकाने मतदार यादीत नाव नोंदणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास प्रमुख प्रा.डॉ.एस.पी.कापडे यांनी केले तर आभार प्रा.सुभाष कामडी यांनी मानले.यावेळी मराठी विभाग प्रमुख डॉ.सुधा खराटे,प्रा.डॉ.एच.जी.भंगाळे उपस्थित होते तसेच कार्यक्रम यशस्वीतेकरिता प्रा.नरेंद्र पाटील,प्रा.गणेश जाधव,मिलिंद बोरघडे,प्रमोद भोईटे यांनी परिश्रम घेतले.