यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील चिंचोली येथे ग्रामविकास अधिकारी म्हणुन कार्यरत असलेले गुरुदास जगन्नाथ चौधरी यांना सेवापुर्तीपर प्रशासकीय पातळीवर निरोप देण्यात आला.यानिमित्त गटविकास अधिकारी यांच्या दालनात दि.३१ जानेवारी २३ रोजी आयोजित कार्यक्रमात गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड (बोरसे )यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सेवानिवृत्तीपर निरोप देण्यात आला.
तालुक्यातील चिंचोली ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी गुरुदास जगन्नाथ चौधरी हे आपल्या प्रदीर्घ प्रशासकीय सेवेतुन नुकतेच सेवानिवृत्त झाले.गुरूदास चौधरी हे अकुलखेडा तालुका चोपडा येथील मूळ रहिवाशी असुन त्यांनी आपल्या प्रशासकीय सेवेची सुरुवात ग्रामसेवक म्हणुन १९९१ वर्षीपासून एरंडोल जिल्हा जळगाव येथून सुरुवात केली.त्यानंतर त्यांनी धरणगाव व यावल येथे त्यांनी आपली प्रशासकीय सेवा बजावली. दि.३१ जानेवारी २३ रोजी आपल्या ३१ वर्षाच्या उत्कृष्ठ सेवाकार्यानंतर गुरुदास चौधरी हे सेवानिवृत्त झाले.आपल्या प्रशासकीय सेवेत गुरुदास चौधरी यांनी एक उमदा व्यक्तिमत्व,कर्तव्यनिष्ठ,कार्यतत्पर,शिस्तप्रिय तसेच चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्याने उत्तर देणारे व नागरीकांचे सहज कामे करून देणारे अधिकारी अशी ओळख त्यांनी जनसामान्यांमध्ये निर्माण केली होती.त्यांच्या सेवाकार्याचे वैशिष्ट म्हणजे दि.८ मार्च ९१ रोजी त्यांचे लग्न झाले त्याच दिवशी त्यांना प्रशासकीय सेवेची ऑर्डर मिळाली.सदरील क्षण म्हणजे दुधात साखर पडल्यासारखे झाले होते हि आठवणीतीत न विसरणारी व आयुष्यभर स्मरणात राहणारी घटना असल्याची प्रतिक्रिया गुरूदास चौधरी यांनी दिली.
यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या दालनात एका छोटेखानी कार्यक्रमात डॉ.मंजुश्री गायकवाड(बोरसे)यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सेवानिवृत्तीपर निरोप देण्यात आला.यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी किशोर सपकाळे,यावल तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष रुबाब तडवी,पोषण आहार अधीक्षक विश्वनाथ धनके,ग्रामसेवक हितू महाजन,संजय चव्हाण,दिनेश पाटील,मयूर पाटील यांच्यासह पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी उपास्थित होते.