यावल-पोलीस नायक(प्रतिनीधी)
तालुक्यातील किनगाव डोणगाव रोडवरील इंग्लिश मेडियम निवासी पब्लिक स्कूल येथे नुकतेच स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले.यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात देशभक्तीसह विविध सांस्कृतीक कार्यक्रम सादर करण्यात आले.
शाळेच्या प्रागंणावर आयोजीत या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कूलचे सचिव मनीष विजयकुमार पाटील हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष शैलेजाताई विजयकुमार पाटील या होत्या.या स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या सुरूवातीला विद्येची देवता असलेल्या सरस्वती मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.तसेच व्यवस्थापक सौ.पूनम मनीष पाटील,प्राचार्य अशोक प्रतापसिंग पाटील,उपप्राचार्य सौ.राजश्री सुभाष अहिरराव यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.यावेळी विद्यार्थी व विद्यार्थीनींनी विविध वेषभुषा परीधान करत वेगवेगळ्या गितांवर नृत्यकला दाखवत संपुर्ण वातावरण संगीतमय केले.गित संगीताची सुरूवात एकदंत वक्रतुंड या गीताने झाली.तर हरहर शंभू,शिव राज्याभिषेक,तेरी उंगली पकड के चला,हनुमान चालीसा,पथनाट्य,देश रक्षणासाठी लढणाऱ्या सैनिकांचे आर्मी डांन्स,शैक्षणिक नाटक,देशभक्तीपर गीते,खेळ मांडला नाटक,मोबाईलचे दुष्परिणाम,व्यसनमुक्तीबाबत जनजागृतीसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.स्नेहसंमेलनासोबतच स्कुलच्या भव्य प्रांगणावर तीन ठिकाणी सेल्फी पॉईंट उभारण्यात आले होते.त्यात इंडिया गेट,भारत माता,आय लव यू ई.एम.पी.एस इ.सेल्फी पाँइंट विद्युत रोशनाईने सजवण्यात आले होते.कार्यक्रमाची रूपरेषा इ.१० वीच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या गाण्यांचा संदेश देत प्रेक्षकांसमोर मांडली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास भालेराव व सौ.पूजा शिरोळे यांनी केले तर समारोप सौ.प्रतिभा धनगर व संपत पावरा यांनी केले.
या स्नेहसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी दिलीप बिहारी संगेले,हर्षल भास्कर मोरे,योगीता प्रकाश बिहारी,देव्यानी शांताराम सोळुंके,मिलींद उत्तम भालेराव,भावना राजेंन्द्र चोपडे,प्रतिभा रमेश धनगर,गोपाळ जयवंत चित्ते,अनिल तापीराम बारेला,पवनकुमार विठ्ठल महाजन,संपत विरसिंग पावरा,वैशाली रविंन्द्र धांडे,शाहरूख रशीद खान,सुहास प्रकाश भालेराव,प्रतिक एम. तायडे,पुजा डी.शिरोडे,तुषार नामदेव धांडे,बळीराम कोतवाल,प्रतिभा पाटील,अनिता देशमुख,रामेश्वरी कांबळे,सोनाली कासार,उज्वला नांदूरे,रत्ना बाविस्कर,जागृती चौधरी,बाळासाहेब पाटील आदींनी परिश्रम घेतले.